इसम बेपत्ता....
पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अशोक रमेश इंगळे (23 रा.नवीन पनवेल) अंगाने मध्यम, रंग गोरा, डोळे घारे, डोक्याचे केस साधारण वाढलेले, उंची 5 फुट, डाव्या हाताच्या बोटावर इंग्रजीमध्ये स्वतःचे नाव नोंदलेले आहेत. दोन्ही हातावर ब्लेडने मारुन घेतल्याचे जुने व्रण आहेत. मिशी जाड काळी, दाढी साधारण वाढलेली, त्याला मराठी भाषा अवगत आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे किंवा पो.हवा.चेतन पाटील यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो ः अशोेक इंगळे