महाराष्ट्र लोकाधिकार समितीची पनवेलमध्ये बैठक संपन्न..
पनवेल / प्रतिनिधी,शनिवार (२८). - पनवेल येथील शासकीय विश्रामगृहामध्ये महाराष्ट्र लोकाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दि.२८ रोजी संपन्न झाली.
या बैठकीमध्ये महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली लोकाधिकार समितीचे ध्येय-धोरणे, उद्दिष्टे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक-अध्यक्ष ऍड. प्रसाद करंदीकर उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड, मुंबई व नवी मुंबई मध्ये संस्थेची बांधणी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे ते राज्याचे समन्वयक अनिल जाधव देखील उपस्थित होते. ऍड. प्रसाद करंदीकर यांनी ही समिती स्थापन करण्यामागची कारणे आणि भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले, यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रत्येकानी आपल्या भावना व्यक्त केल्या, सर्वांनी समितीमध्ये काम करण्याचे मान्य केले.
यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या, त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. बैठकीचे आयोजन व सूत्रसंचालन राज सदावर्ते यांनी केले.