प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन...
प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
पनवेल / प्रतिनिधी : -
 प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल येथील संग्राम निवासस्थानी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, शिवसेनेचे उपनेते बबन पाटील (उ बा ठा)भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, विजय चिपळेकर, संतोष शेट्टी, प्रभाकर बहिरा, सुनील बहिरा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व. दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करत त्यांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञतेने आदरांजली अर्पण केली. या वेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी दि. बा. पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे स्मरण केले.
Comments