सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे पद्मश्री अच्युत पालव यांचा सन्मान...

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे पद्मश्री अच्युत पालव यांचा सन्मान...
   पनवेल / प्रतिनिधी : -   पद्मश्री अच्युत पालव हे प्रसिद्ध सुलेखनकार (कॅलिग्राफर) आणि शिक्षक आहेत. त्यांना भारतीय लिप्यांच्या कलेतील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे कॅलिग्राफीतील योगदान खूप महत्त्वाचे आहे.अच्युत पालव यांनी कॅलिग्राफी या पारंपरिक कलेला नवी ओळख दिली आहे. त्यांनी मोडी लिपी आणि इतर भारतीय लिप्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 2025 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना भारतीय लिप्यांच्या कलेतील योगदानाबद्दल आणि राष्ट्रीय स्तरावर या कलेला प्रसिद्धी मिळवून देण्याबद्दल दिला आहे. त्यांच्या कॅलिग्राफीची शैली अभिव्यक्त आणि वेगळी आहे. ते टूथब्रश आणि स्पॅटुला सारख्या अपारंपरिक साधनांचाही वापर करतात.
         त्यांनी शहराच्या सुशोभीकरणासाठी 'चित्रकविता भिंती' (पोएटिक वॉल आर्ट) या संकल्पनेवर काम केले आहे, ज्याने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी  नावाचे ते एक स्कूल चालवतात जिथे ते कॅलिग्राफी शिकवतात. 
       महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग मधील अणावं गावचे ते निवासी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या वतीने पद्मश्री अच्युत रामचंद्र पालव यांचा पारंपारिक पद्धतीने शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचा लोगो देखील त्यांनीच बनवला आहे. ह्या सत्कार प्रसंगी संघाचे अध्यक्ष केशव राणे, सचिव बाप्पा मोचेमाडकर, मंगेश अपराज, वासुदेव सावंत, प्रदीप रावले,कालिदास कावले, बाळाजी रावराणे, अरविंद खांडेकर उपस्थिती होते.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image