लोकनेते दि बा पाटील पुण्यतिथीनिमित्त ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे च्या वतीने जिल्हा परिषद शाळांना मोफत दप्तर वाटप ...
लोकनेते दि बा पाटील पुण्यतिथीनिमित्त ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे च्या वतीने जिल्हा परिषद शाळांना मोफत दप्तर वाटप ...
पनवेल / (शंकर वायदंडे)  :-
ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे च्या वतीने  लोकनेते स्व दि बा पाटील यांच्या 12 व्या पुण्यतिथीनिमित्त  ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे हद्दीतील रायगड जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले
 मंगळवार दिनांक 24 जून रोजी रायगडचे लोकनेते स्वर्गीय नेते दिबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देत ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा शिवनसई, दुंदरे, दूंदरेपाडा, रिटघर, चिंचवली या पाच शाळांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले तसेच येथील अंगणवाडींना रिटघर गावच्या ऍड रेश्मा गुरुनाथ भोपी आणि मा.सरपंच भारत भोपी यांच्या वतीने ५ अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले.
 यावेळी उपस्थित मान्यवर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सुभाष शेठ भोपी, समाजसेवक गुरुनाथ भोपी, माजी सरपंच भारत भोपी, उपसरपंच शितल भोपी,    ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, सदस्य शांताराम चौधरी, महेश पाटील ,राणी सिनारे, सुप्रिया करमेळकर ललिता चौधरी, शकुंतला गोसावी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक महादेव गायकर, भीमा गोसावी, अर्जुन पाटील,  समाजसेवक नरेंद्र भोपी, रिटघर हायस्कूलचे प्राचार्य कारंडे सर व सर्व शाळेचे शिक्षक वृंद, ग्रामस्थ, तसेच उपस्थित मंडळीचे ही स्वागत करून मुलांना त्यांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आली.
Comments