मोनॅको फॉर्म्युला 2 स्पर्धेत कुश मैनी ला ऐतिहासिक विजय प्राप्त
मुंबई,(पनवेल वैभव) ११ जून २०२५ : भारतातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण समूहांपैकी एक असलेल्या रेमंड ग्रुपने, मोनॅको ग्रांपीमधील कुश मैनीचा फॉर्म्युला 2 मधील विजय साजरा करण्यासाठी मुंबईतील जेके हाऊस येथे एक विशेष प्रेस कॉन्फरेन्स आयोजित केली होती. या खेळातील भारताचा हा पहिलाच विजय होता. या कार्यक्रमाचे आयोजन रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. गौतम सिंघानिया यांनी केले होते. सिंघानिया स्वतः या खेळाचे चाहते आहेत तसेच फेरारी चॅलेंज सिरीज ईयूमध्ये त्यांनी पहिल्या तिघांत स्थान मिळवले आहे. कुशचे वडील आणि रेमंड ग्रुपचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी श्री. गौतम मैनी यांच्या उपस्थितीत श्री. सिंघानिया यांनी कुशचा सत्कार केला.
श्री.गौतम हरी सिंघानिया यांनी सुरुवातीच्या काळात कुश मैनीला बरेच पाठबळ दिले. तसेच त्याचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोटरस्पोर्ट्स आणि स्पर्धात्मक रेसिंगमधील सिंघानिया यांचा प्रदीर्घ अनुभव आणि भारतासाठी एफआयए प्रतिनिधी म्हणून काम करणे याचे कुश यांच्या सुरुवातीच्या यशात महत्त्वाचे योगदान आहे.
श्री.गौतम हरी सिंघानिया म्हणाले की,"मोनॅको येथील विजयानंतर अभिमानाने तिरंगा फडकत असताना राष्ट्रगीत ऐकणे हा रेमंडसाठी आणि वैयक्तिकरित्या माझ्यासाठीही अभिमानाचा क्षण होता. F2 मध्ये भारतीय प्रतिनिधित्वाचा अनोखा क्षण साजरा करताना आम्हाला आनंद होत आहे. उत्कृष्टता, शिस्त आणि लवचिकता ही मूलभूत भारतीय मूल्ये रुजलेला कुश मैनी हा भारताचे प्रतिनिधित्व करतो. तो भारताचे आशास्थान आहे. आपले शताब्दी वर्ष साजरे करत असताना, कुशचे यश हे भारताच्या पुढील पिढीतील जागतिक कामगिरी करणाऱ्यांना प्रेरणा आणि सक्षम करण्याच्या रेमंडच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे."
मोनॅको येथे कुश मैनीचा फॉर्म्युला 2 मधील विजय हा भारतीय मोटरस्पोर्ट इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण आहे. या प्रतिष्ठित सर्किटवर विजय मिळवणारा पहिला भारतीय म्हणून, कुशने 2024 च्या हंगामात पोल पोझिशन आणि पहिल्या तिघांत येत धमाकेदार कामगिरी केली. आता अल्पाइन F1 संघासाठी तो राखीव ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. जागतिक रेसिंग स्टेजवर तो भारताचे स्थान मजबूत करतो आहे.
या प्रसंगी कुश मैनी म्हणाले,“श्री. सिंघानिया आणि वारसा, नेतृत्व आणि उत्कृष्टतेचे प्रतीक असलेल्या रेमंड ग्रुपचे पाठबळ मिळणे ही खरोखरच अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. श्री. सिंघानिया यांची मोटरस्पोर्ट्सची सखोल समज आणि त्यांचा उत्साह सर्वांना प्रेरणादायी ठरतो. 100 वे वर्ष साजरे करणाऱ्या आणि प्रतिभा तसेच जागतिक पातळीवर यशस्वी ठरलेल्या राष्ट्रीय ब्रँडशी जोडले जाणे खरोखरच विशेष आहे.”
कुश यांचे यश साजरे करण्याचा हा कार्यक्रम केवळ असाधारण क्रीडा कामगिरीला मान्यता देत नाही. तर पुढील शतकात विविध क्षेत्रात परिणामकारक आणि नावीन्यपूर्ण कामगिरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या भारतीय उत्कृष्टतेला पाठिंबा देण्याच्या रेमंडच्या अढळ वचनबद्धतेला देखील अधोरेखित करतो.