बॉलिवूड अभिनेत्री तब्बू च्या हस्ते कल्याणच्या नव्या शोरूमचे शुभारंभ...

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू च्या हस्ते कल्याणच्या   व्या शोरूमचे शुभारंभ...

कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमध्ये जागतिक दर्जाच्या वातावरणात लक्झरी शॉपिंगचा अनुभव घ्या

 

नवी मुंबई,(पनवेल वैभव)३० जून २०२५: भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सतर्फे रविवारी २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता नवी मुंबईतील नेक्सस सीवुड्स मॉलमध्ये आपल्या नव्या कोऱ्या शोरूमचे उद्घाटन केले. बॉलिवूड अभिनेत्री तब्बू च्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या शोरूम मध्ये कल्याण ज्वेलर्सच्या वैविध्यपूर्ण कलेक्शन्समधील अनेकविध डिझाइन्सचा समावेश आहे.या कार्यक्रमाला उत्साही गर्दी लक्षणीय प्रमाणात जमली होती. सर्व उपस्थितांचे स्वागत खूप छान पद्धतीने करण्यात आल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या प्रसंगाने निर्माण झालेल्या उत्साह आणि अपेक्षांचे हे प्रतिबिंब होते. 


या कार्यक्रमाला उपस्थितांशी संवाद साधताना बॉलिवूड अभिनेत्री तब्बू म्हणाली, “कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटनासाठी येथे उपस्थित राहताना मला खूप आनंद होत आहे. विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक-केंद्रित  मूल्यांवर  आधारित असलेल्या या ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मला खात्री आहे की आपले ग्राहक केवळ उत्कृष्ट सेवाच नव्हे, तर विविध प्रकारच्या दागिन्यांच्या कलेक्शन्सचेही मनापासून स्वागत करतील.” 


श्री.रमेश कल्याणरामनकार्यकारी संचालककल्याण ज्वेलर्स म्हणाले,“नवी मुंबईतील आमच्या कल्याण ज्वेलर्सच्या नव्या कोऱ्या शोरूमच्या उद्घाटनासह आमचे ध्येय हे आमच्या ग्राहकांच्या खास गरजा पूर्ण करणारी एक व्यापक परिसंस्था निर्माण करणे आणि त्यांच्या खरेदी अनुभवाला एका नवीन पातळीवर नेणे हे आहे. सतत प्रगती करत राहणे, जागतिक दर्जाचे वातावरण देताना विश्वास आणि पारदर्शकता या ब्रँडच्या मुख्य मूल्यांना कायम ठेवणे यासाठी आम्ही बांधील आहोत. कल्याण ज्वेलर्समध्ये आम्ही उत्कृष्ट दर्जा आणि अतुलनीय सेवा यांवर भर देत देखण्या व वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांच्या विस्तृत श्रेणीसह ग्राहकांना समाधान देत राहू.” 


या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सच्या लोकप्रिय हाउस ब्रँड्सची देखील भरपूर विविधता असेल. त्यामध्ये मूहूर्त (लग्नासाठीचे खास दागिने), मुद्रा (हस्तकलेने बनवलेले प्राचीन धाटणीचे दागिने), निमह (देऊळ शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), जिया (सॉलिटेअरसारखे डायमंड दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी डायमंड्स), अंतरा (लग्नासाठी डायमंड्स), हेरा (रोजच्या वापरातील डायमंड्स), रंग (मूल्यवान रत्नदागिने) आणि अलिकडेच सादर झालेला लीला (रंगीत रत्न व हिऱ्याचे दागिने) यांचा समावेश असणार आहे. 

Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image