पनवेलकरांच्या निरोगी आयुष्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)महिला आघाडी सरसावली...
पनवेलकरांच्या निरोगी आयुष्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)महिला आघाडी सरसावली...


पनवेल वैभव / दि. २१ (संजय कदम) : पनवेलकरांच्या निरोगी आयुष्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी सरसावली असून महानगर पालिकेच्या माध्यमातून विविध प्रभागात स्वच्छता मोहीम उपक्रम राबविला जात आहे. 
त्यानुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहर संघटिका अर्चना अनिलकुमार कुळकर्णी यांना प्रभाग १९ मधिल नागरिक, डॉक्टर यांच्या ड्रेनेजसंदर्भात तक्रारी येत होत्या. स्वा. सावरकर रस्ता, महात्मा फुले  रस्ता, बुधकर दवाखाना, जोशी डॉक्टर (डोळयांचे हॉस्पिटल) व पुढे तुळजाभवानी पतपेढी, पुढे जुने पोस्ट ऑफिस येथिल गटारे वहात होती. कचरा भरपूर प्रमाणात होता. याबाबत पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र भोईर यांच्याशी संपर्क साधून त्यांना नागरी समस्या संदर्भात माहिती दिली. लगेचच त्यांनी आपली स्वच्छता टीम पाठवून गटारे साफ केली. या कामी स्वच्छता निरीक्षक भोईर, रीना बेहरे, स्वच्छता टीम यांनी सहकार्य केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. 



फोटो : स्वच्छता मोहीम
Comments