ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी
पनवेल वैभव दि. १९ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात असलेले अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या युवासेने तर्फे आज पनवेल महानगरपालिके कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .
युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते व युवासेना तालुका अधिकारी मनोज कुंभारकर,युवासेना पनवेल महानगर चिटणीस जीवन अनंत पाटील यांनी आज पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांची भेट घेऊन तालुक्यातील प्रभाग क्रमांक २ मधील देवीचा पाडा येथील गावाच्या अंतर्गत असलेले रस्ते तसेच इतर भागातील जुने विजेचे खांब (Street Light) बदलून नवीन खांब लावणे तसेच मुख्य हायवेवरील बेल नाका येथे नव्याने नवीन निवारा व्यवस्था उभी करण्याबाबत मागणीचे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच गावातील अन्य ठिकाणी ही वीज सुविधा यंत्रणा तपासण्याच्या सूचना केल्या.
फोटो - युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिके कडे मागणी निवेदन