मोदिजींच्या मन की बात द्वारे थेट संवाद करंजाडे वासीयांशी..
करंजाडेत तब्बल अकरा ठिकाणी होणार “मन की बात” थेट प्रसारण
भाजप माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा पुढाकार
पनवेल/प्रतिनिधी -- माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांना उद्देशून “मन की बात” मधुन संवाद साधतात. या कार्यक्रमाचे कौतुक संपूर्ण जगभर होते आहे. तसेच 11 वर्षे राष्ट्र सेवेची, समर्पणाची, सुशासनाची पंतप्रधान मोदिजींच्या मन की बात द्वारे थेट संवाद रविवारी 29 जून रोजी सकाळी 11 वाजता भारतीयांशी साधणार आहेत.
त्या निमित्ताने मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करंजाडे वासियांसाठी करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाजपचे रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून 11 ठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याची महियी मा.सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी दिली.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष भाजप नेते जे.एम म्हात्रे, माजी विरोधीपक्षनेते भाजप नेते प्रितम म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक गणेश कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करंजाडे वसाहतीत अकरा ठिकाणी मन की बात या कार्यक्रमाचे जाहीर प्रसारण करण्यात येणार आहे. त्यामुळे करंजाडे वसाहतीतील सर्व नागरिकांनी या मन की बात कार्यक्रमाच्या प्रसारणात सहभागी व्हावे असे आवाहन भाजप, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी केले आहे.
या ठिकाणी होणार थेट प्रसारण...
1. भारतीय जनता पार्टी कार्यालय से. ३, करंजाडे
२. साई दिप रेसिडेन्सी, प्लॉट नं. १२, से. ३, करंजाडे
३. रत्नेश्वर व्हिव, प्लॉट नं. १११, से. ३, करंजाडे
४. जेष्ठ नागरीक सामाजिक संस्था कार्यालय से. ४, करंजाडे
५. कलश रेसिडेन्सी, प्लॉट नं. १०, से.४, करंजाडे
६. पल्लवी डान्स अॅकडमी, प्लॉट नं. १४३, से. ४, करंजाडे
७. श्री. रामेश्वर आंग्रे जनसंपर्क कार्यालय से. ५, करंजाडे
८. श्री स्वामी समर्थ कृपा सी.एच.एस., से. ५, करंजाडे
९. गावदेवी गणेशोस्तव मंडळ से. ६, करंजाडे
१०. एस. जी. इंटरनॅशनल स्कुल, बौध्दविहार वडघर
११. गणेश नगर, गणेश मंदिर सभा मंडप.