स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या हस्ते गुरु लिंगेश्वर शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप ...
पनवेल वैभव / दि. २६ (संजय कदम) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी गुरु लिंगेश्वर शाळा पनवेल एसटी स्टँडच्या मागे येथे मोफत वाहया वाटपाचा कार्यक्रम संपन्न केला . त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबा नाईक,निलेश कांबळे, समाधान कांबळे ,भारत दाताड, चंद्रकांत वेळासकर, मनोज कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष ममताज पठाण ,सुमन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे पालक वर्ग उपस्थित होते.
गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचण येऊ नये म्हणून दरवर्षी महेश साळुंखे हे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करत असतात. समाजाप्रती असलेल्या सामाजिक जाणीव यांच्या बांधिलकीतून ते दरवर्षी हा कार्यक्रम वडघर येथील रायगड जिल्हा प्राथमिक शाळा व गुरु लिंगेश्वर शाळा येथे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेत असतात . त्यांच्या या कार्यक्रमांमुळे समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान देण्यात येते.
फोटो : वह्या वाटप