मोठे दर्गा मागे महापालिकेत कामासाठी येणार्या लोकांसाठी पार्किंग उपलब्ध करून देण्याची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी
पनवेल वैभव, दि.20 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील मोठ्या दर्गा मागे असलेल्या मोकळ्या जागेत महापालिकेत कामासाठी येणार्या लोकांसाठी पार्कींगची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महापालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महापालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रविण पोपटराव जाधव, विभागप्रमुख जुनैद पवार, विभागप्रमुख प्रशांत नरसाळे, उपशहर संघटीका उज्वला गावडे, विभाग संघटीका अश्विनी देसाई, उपविभागप्रमुख प्रदीप माखीचा, शाखाप्रमुख मयरुेश पाटील यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शहरप्रमुख प्रवीण जाधव यांनी सांगितले की, पनवेल महानगरपालिकेत खूप लोक कामानिमित्त येतात आणि कार कुठेही पार्क करतात. पालिके जवळ खूप ट्रॅफिक होते त्यामुळे स्कूल बस, एनएमएमटी बसेस, ट्रक, तसेंच सर्व वाहनाना , स्थानिक रहिवासी यांना खूप त्रासास सामोरे जावे लागते. तरी पालिकेत येणार्या लोकांसाठी पालिकेने मोठी दर्गा मागे पार्किंग करावयास सांगावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे जुन्या कोर्ट जवळ पालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे ते नागरिकांना वापर करायला खुले करावे अश्या मागणीचे पत्र यावेळी देण्यात आले.
फोटो ः कैलास गावडे यांना निवेदन देताना शिवसैनिक