पनवेल शहर पोलीस ठाण्यासह पनवेल तालुका पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत ३५ बांगलादेशीय ताब्यात...
पनवेल शहर पोलीस ठाण्यासह पनवेल तालुका पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत ३५ बांगलादेशीय ताब्यात...


पनवेल, दि.9 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्‍या 35 बांगलादेशीयांन पनवेल शहर पोलीस ठाण्यासह पनवेल तालुका पोलिसांच्या विशेष पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात बांगलादेशीयांना शोधण्याचे काम परिमंडळ 1 व परिमंडळ 2 येथे सुरू असून त्या अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शहरातील तक्का परिसरात कारवाई करत 12 जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने अशाच प्रकारे कारवाईत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वावंजे परिसरात करून तेथून 23 बांगलादेशीयांना ताब्यात घेवून पुढील शासकीय कारवाई करण्यात आली आहे.
Comments