तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी अपोलोचा स्क्रीनिंग प्रोग्रॅम....
नवी मुंबई, ३० मे २०२५: जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने (AHNM) तोंडाच्या कर्करोगाचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी #IPromise हा एक सक्रिय स्क्रीनिंग उपक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम तंबाखू आणि मद्यपान करणाऱ्यांबरोबरीनेच ज्यांना या आजाराचा धोका खूप जास्त आहे अशा व्यक्तींसाठी जनजागृती, नियमित तपासणी आणि टार्गेटेड उपाययोजना यावर भर देतो. तंबाखूचे सेवन ही आता वैयक्तिक सवय राहिलेली नाही तर एक राष्ट्रीय आरोग्य संकट बनले आहे. जगभरातील तोंडाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या भारतात आहेत. दरवर्षी ७७,००० नवीन केसेसचे निदान होते आणि ५२,००० लोक या आजारामुळे आपला जीव गमावतात. तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांचा जगण्याचा दर फक्त ५०% आहे, जो विकसित देशांपेक्षा खूपच कमी आहे (लिंक). घरगुती वापर खर्च सर्वेक्षण (२०२२-२३) (लिंक) मध्ये स्पष्टपणे दर्शविल्याप्रमाणे, शहरी आणि ग्रामीण भारतात तंबाखूचा वाढता वापर या चिंताजनक ट्रेंडचा वेग दर्शवितो. त्यात पान, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांवरील वाढत्या खर्चाचा उल्लेख आहे.
डॉ.अनिल डी'क्रूझ, डायरेक्टर ऑन्कोलॉजी आणि सिनियर हेड आणि नेक ऑन्को सर्जन, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,"तंबाखू सेवन करणाऱ्यांना तंबाखू सेवन न करणाऱ्यांपेक्षा तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता ६ ते ७ पट जास्त असते. तोंडाचा कर्करोग हा अशा काही कर्करोगांपैकी एक आहे जो तोंडाच्या साध्या तपासणीने खूप सुरुवातीच्या टप्प्यात शोधता येतो. या कार्यक्रमाद्वारे, आम्ही खूप उशीर होण्यापूर्वी - लवकरात लवकर केसेस शोधणे हे आमचे उद्दिष्ट आहे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेची संस्कृती वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तोंडाचा कर्करोग लवकरात लवकर समजून आल्यास बरा होऊ शकतो. आम्ही ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला, विशेषतः तंबाखू सेवन करणाऱ्यांना, स्वतःची तपासणी करून घेण्याचे आवाहन करतो."
तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढवणारे जोखीम घटक - जसे की धूररहित तंबाखू, सुपारी आणि अल्कोहोल यांचा एकत्रितपणे वापर करणे - ज्यांना प्रतिबंधात्मक देखभाल सुविधा मिळत नाहीत अशा वंचित समुदायांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतात. हा आजार ३१-५० वयोगटातील लोकांना होण्याचे प्रमाण वाढत आहे, या लोकांमध्ये कमी पोषणामुळे धोका आणखी वाढतो.
श्री अरुणेश पुनेथा, पश्चिम विभाग-रीजनल सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,“हा उपक्रम सर्वसमावेशक ऑन्कोलॉजी देखभालीमध्ये अपोलोचे नेतृत्वस्थान दर्शवतो. आमचे ध्येय केवळ उपचारांपुरते मर्यादित नाही - तर लोकांना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साधने आणि ज्ञानाने सुसज्ज करणे आहे. स्थानिक समुदाय आणि आमच्या कॉर्पोरेट भागीदारांसोबतची आमची भागीदारी आजाराचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वाची आहे. या मोहिमेद्वारे, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई तंबाखू वापरणाऱ्यांना आवाहन करत आहे की त्यांनी त्यांच्या सवयींच्या खऱ्या किमतीचे पुनर्मूल्यांकन करावे-केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे तर भावनिक कल्याणाच्या दृष्टीने देखील. ही मोहीम प्रतिबंधासाठी सर्वात शक्तिशाली साधने म्हणून लवकरात लवकर निदान आणि दीर्घकालीन जीवनशैलीतील बदलांचे मूल्य अधिक बळकट करते.”
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने स्थानिक समुदाय गट आणि कॉर्पोरेट्ससोबत हातमिळवणी केली आहे जेणेकरून तंबाखूच्या व्यसनातून बरे होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना मदत मिळेल. या भागीदारीमुळे शारीरिक आरोग्य उपाय आणि मानसिक व भावनिक कल्याण यांची सांगड घालण्यात आली आहे.