पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरात भगवान शिव महाआरतीचे भव्य आयोजन
पनवेल (प्रतिनिधी) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरात भव्य शिवमहाआरतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते महाआरती झाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि भगवान शंकराची आराधना करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. यानिमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि समाजसेवा उपक्रमांचा यात समावेश आहे. त्यानुसार पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, श्रीनंद पटवर्धन, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, माजी नगरसेवक गणेश कडू, अजय बहिरा, सुनील बहिरा, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, रुचिता लोंढे, भाजपचे पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष केदार भगत, सरचिटणीस अमित ओझे, रुपेश नागवेकर, रोहित जगताप, सतीश पाटील, संदीप पाटील, देवांशू प्रभाळे, सपना पाटील, स्वाती कोळी यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते