शेकापचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा
पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात महाप्रवेश,
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नामदार आशिष शेलार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत ...
पनवेल (हरेश साठे) शेकापचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते तसेच पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पनवेल, उरण, खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला. पक्षप्रवेशाची भली मोठी रांग यावेळी लागली त्यामुळे रायगडमध्ये राजकीय भूकंप होत शेकापला मोठा हादरा बसला आहे. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
शेकापचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते तसेच पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासोबत शेकापचे जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक गणेश कडू, उपाध्यक्ष रवीशेठ पाटील, वहाळचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते पांडुमामा घरत, ज्येष्ठ नेते हरचंदसिंग सग्गू, ज्येष्ठ नेते रघुशेठ घरत, मनुशेठ कांडपिळे, तालुका सहचिटणीस जितेंद्र म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, लाल ब्रिगेड तालुकाध्यक्ष रमाकांत पाटील, प्रकाश जितेकर, माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर, प्रिती जॉर्ज म्हात्रे, अरुणा दाभणे, सारिका भगत, पुष्पलता मढवी, श्वेता बहिरा, कुसुम पाटील, रेणुका मोहोकर, प्रार्थना वाघे, मंजुळा कातकरी, माजी नगरसेवक रवींद्र भगत, सुनिल बहिरा, गणेश पाटील, डी. पी. म्हात्रे, आकाश ठोकळ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजुशेठ पाटील, जीवन म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वती पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती निशा लक्ष्मण ठाकूर, माजी उपसभापती जगदीश पवार, सीमा घरत, भात गिरणी सहकारी संस्था उपसभापती राजेंद्र घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, वहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील, अरुण दापोलकर, सुनील पाटील, गणेश पाटील, गव्हाणच्या माजी सरपंच माया भोईर, सचिन घरत, एल.एल. पाटील, कोळखे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनल म्हात्रे, उषा अजित अडसुळे, कर्नाळा माजी सरपंच सुषमा पाटील, मानघर सरपंच राजेंद्र पाटील, वावेघर सरपंच गीतांजली गाताडे, तुराडे सरपंच रिया माळी, गुळसुंदे उपसरपंच अरुणा पाटील, माजी सरपंच आर. डी. पाटील, गुरुनाथ माळी, सदस्या काव्या जोशी, दीपाली जगताप, अभिजित पाटील, यांच्यासह शेकापच्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच काँगेस, शिवसेना (ठाकरे गट), मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
महाविकास आघाडीने जयंत पाटील यांच्या विधान परिषद निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीतही शेकापचा घात केला. त्यामुळे या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शेकापचे अस्तित्व रसातळाला गेले. अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेकापची साथ सोडत दुसऱ्या पक्षाची वाट धरली. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून पक्ष वाढवायचा आग्रह जे.एम. म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता. गेल्या दिड महिन्यापासून त्यांचा पक्षाकडे मागणीचा रेटा राहिला. त्यांनी या संदर्भात मध्यंतरी पक्षाची बैठक घेतली त्यावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडा आपण पक्ष वाढवू अशा स्पष्ट भाषेत सांगितले मात्र तरीही त्यांना साथ न देण्याचा इरादा पक्षाने घेतला. त्यामुळे जे. एम. म्हात्रे यांनी अखेर आपला निर्णय जाहीर करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. आणि या निर्णयाला त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्यामुळे त्यांचाही विचार लक्षात घेऊन जे.एम. म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय पक्षात जाण्याचा निर्णय केला. माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे गेली ४८ वर्षे शेकापक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत होते. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायचे. पण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उरण मतदार संघातून त्यांचे चिरंजीव प्रितम म्हात्रे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काम केले. शेकापनेते जयंत पाटील यांना महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेना उबाठा गटाकडून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभवाचा जोरदार आणि अनपेक्षित झटका दिला आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील वचपा काढल्याचा महाराष्ट्राने बघितले. महाविकास आघाडीचा घटक म्हणून शेकापही असताना लाचारीपोटी शेकापच्या नेत्यांनी पराभव सहज स्वीकारला आणि तशी चर्चा सर्वत्र रंगली. एकेकाळी अभिमानाने राजकारणात असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला मोठी घरघर लागली पण शेकापच्या नेतृत्वाने ते कधीही मान्य केले नाही. आणि त्यामुळे शेकापच्या नेत्यांना या कारभाराचा कंटाळा आला. पक्ष वाढ खुंटली आणि जनाधारही दिवसेंदिवस घटत चालला. मागील महिन्यात जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी मंत्री स्व. मिनाक्षीताई पाटील यांचे चिरंजीव व रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील यांनी हजारो समर्थकांसह भाजपात प्रवेश करत अलिबागमध्ये जोरदार धक्का दिला. त्यानंतर काही दिवसातच पनवेलमध्ये शेकापला मोठा दणका मिळाला. प्रभुदास भोईर यांनी पंधराशे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. शेकाप या झटक्यातून सावरत नाही तोच जे.एम.म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांनी पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ शेकापवर आली आहे.
कोट-
देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाची तर राज्याचे कुशल नेतृत्व मुख्यमंत्री फडणवीस राज्याची ताकद आहे. त्यांच्या नेतृत्वात देश आणि राज्य पुढे यशस्वी मार्गक्रमण करत आहे. तळागाळातील कार्यकर्ते समाज बांधवांच्या समस्याचे निराकरण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. सन २०४७ ला आपला देश महासत्ता होणार आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा असला पाहिजे यासाठी सन २०२८ च्या अगोदर तीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट देवेंद्रजीनी ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाही. जे. एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांनी त्यांच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अशा या पक्षात तुम्ही आज सहभागी झाला आहात याचा निश्चित तुम्हाला अभिमान वाटेल. - रविंद्र चव्हाण, कार्यकारी अध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश भाजप
कोट-
२००४ साली शेकापक्षातून बाहेर पडलो त्याची आठवण देणारा आजचा पक्षप्रवेश आहे. जे. एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते आज भाजपमध्ये सहभागी झाले याचा मला खूप आनंद आहे. रविंद्र चव्हाण यांनी पाठीवर हात ठेवला की शंभर टक्के विजय होतो. पनवेल महापालिका निवडणुकीच्यावेळी त्यांनी दिशा दिली, मार्ग दिला. आणि त्या ठिकाणी सहज विजय मिळवत सत्ताही मिळाली. रविंद्र चव्हाण यांचे नेतृत्वामध्ये शक्ती आहे कार्यकर्त्याना तयार करण्याचा उत्साह आहे. जे. एम. म्हात्रे माझे खास मित्र आहे. राजकारणाच्या दृष्टीकोनातून आमची ताटातूट झाली होती. व्यवसायात कधीही राजकारण आणायचे नसते. मात्र आम्ही व्यावसायिक म्हणून काम करत होतो. या प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात ताकद वाढली आहे. विरोधकांना आम्हाला बिनविरोध देण्याशिवाय पर्याय नाही. काम करणार त्याला संधी मिळणार आणि या ठिकाणी जुना नवा असा कोणताही भेदभाव नाही. त्यामुळे आगामी निवडणुका जिंकण्याच्या आणि लोकांची सेवा करण्यासाठी कायम सज्ज राहू या. - लोकनेते रामशेठ ठाकूर
कोट-
भगतसाहेबांच्या पुण्यभूमीत आपण वाढलो आहोत. शेकापने मला पदांवर संधी दिली आणि मी पण पक्षवाढीसाठी तन मन धनाने काम केले. महाविकास आघाडीने शेकापक्षावर अन्याय केला त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून शेकाप अबाधित ठेवत कार्यकर्त्याना बळ देऊ अशी पक्षश्रेष्ठींना विनंती केली. मात्र त्यांच्याकडून साफ इन्कार आला. ज्या महाविकास आघाडीने आपल्याला संपवण्याचा घाट केला आहे, त्यांच्याबरोबर राहून कार्यकर्त्यांचेही भले होणार नाही त्यामुळे मुख्य प्रवाहात काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज भाजपमध्ये दाखल झालो. शेकापक्षात ज्या प्रमाणे काम केले त्याप्रमाणे भाजपात आम्ही सक्रियपणे काम करणार असून हे सर्व रामशेठ ठाकूर यांच्यामुळे शक्य झाले. - उद्योजक जे.एम. म्हात्रे, माजी नगराध्यक्ष- पनवेल नगर परिषद
कोट-
माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व आहे. भाजप जिल्हयात एक नंबरचा पक्ष बनत आहे. खासदार, आमदार, ते सरपंच लोकप्रतिनिधी तळागाळातील लोकांसाठी काम करत आहेत. २०१८ साली रविंद्रजी चव्हाण रायगडचे पालकमंत्री झाले आणि जिल्ह्यातील एक एक करत निवडणुका जिंकत गेलो. आता प्रत्येक स्तरावर भाजपचे नेतृत्व आहे. कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार जनतेसाठी अग्रेसरपणे काम करत आहे. देश हितासाठी काम करणाऱ्या पक्षात आलो आहोत याचा तुम्हाला नक्कीच समाधान आणि अभिमान वाटेल. पनवेल, उरण, खालापूर मधून तुमच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. - आमदार प्रशांत ठाकूर
कोट-
प्रितम म्हात्रे हे समाजाला जोडले आहेत तर जे. एम. म्हात्रे पक्षभेद बाजूला ठेऊन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सोबतीने काम करत आहेत. आजच्या या प्रवेशाने ताकद वाढली आहे. आजचा पक्षप्रवेश आणि झेंडा देशप्रेमाचा आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका शंभर टक्के जिंकणार याची मला खात्री आहे. पक्षात जुना नवा असा कोणताही विचार न करता एकसंघ काम करत राहू या. - आमदार महेश बालदी
कोट-
केंद्रात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे विकासाला मोठी गती मिळाली. विकासाचा ओघ लक्षात घेऊन विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा ओढा वाढत आहे. देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ज्याचे १४ कोटी सदस्य आहेत आणि सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आहेत. जिल्ह्यात २०१४ साली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने पहिला आमदार, त्यानंतर २०१९ ला त्यामध्ये महेश बालदी यांच्या रूपाने आणखी एक आमदार आणि आता २०२४ च्या निवडणुकीतून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, तसेच खासदार म्हणून धैर्यशील पाटील, विधान परिषद सदस्य म्हणून विक्रांत पाटील अशी एकूण लोकप्रतिनिधींची ताकद वाढली आहे. त्यामुळे जगात, राज्यात आणि रायगडमध्येही भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे. - अविनाश कोळी, जिल्हाध्यक्ष- उत्तर रायगड जिल्हा भाजप.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशिल पाटील, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी आमदार सुरेश लाड, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड. आस्वाद पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, रवी भोईर, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, संजय पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, तळोजा मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कर्नाळा मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उलवे मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.