सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही सन्मानाने जगा ; महेंद्रशेठ घरत...
सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही सन्मानाने जगा ; महेंद्रशेठ घरत...

उलवे, ता. ३१ : नोकरीत चाकोरीबद्ध जीवन जगण्यासाठी कसरत करावी लागते. मुलाबाळांचे संगोपन करण्यात दमछाक होते, पण बी. सी. ठाकूर यांनी गरिबीवर मात करून महावितरणच्या सेवेतही आपली मान उंचावली, हे कौतुकास्पद आहे. पूर्वीचा काल हा गरिबीचा होता आणि त्यावेळी खूप मेहनत करून हे विद्यार्थी घडले आहेत, आयफोन पिढीनेसुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा. आता सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही ठाकूर यांनी सन्मानानेच जगावे, असे मत महेंद्रशेठ घरत यांनी चिरनेर येथे व्यक्त केले. त्यांच्या हस्ते बी. सी. ठाकूर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.

बी. सी. ठाकूर यांनी चिरनेर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, तिरंगा पतपेढीचे माजी चेअरमन तथा संचालक, पाणीपुरवठा समितीचे माजी सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
त्यांनी महावितरणमध्ये 28 वर्षांची सेवा केली. त्यानिमित्त सेवानिवृत्तीचा कार्यक्रम खारपाटील विद्यालय चिरनेर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी अनेक क्षेत्रातील मंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल, शेतकरी कामगार पक्षाचे नेते सुरेश पाटील, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी, जासई ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मुरलीधर ठाकूर, तिरंगा पतपेढीचे व्हाईस चेअरमन घनश्याम पाटील, शिवधन पतसंस्थेचे चेअरमन गणेश म्हात्रे, व्हाईस चेअरमन गजानन वाशिनीकर, चिरनेरचे माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, संतोष ठाकूर, अशोक मुंबईकर, डी. आर. पाटील सर, हेमाली मोकल तसेच महाराष्ट्र विद्युत मंडळातील अनेक अधिकारी, कर्मचारी, तसेच चिरनेर ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. उरण तालुका युवक इंटकचे अध्यक्ष तथा चिरनेर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र भगत यांनी सूत्रसंचालन केले.
Comments