पनवेल तालुक्यात मनसेला खिंडार ; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश...
पनवेल तालुक्यात मनसेला खिंडार ;
अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश...
 पनवेल / प्रतिनिधी : -
सध्या राज्यभरात शिंदे शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू असून पनवेल तालुक्यातील मनसेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते व मित्रमंडळीसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश केला.
शिवसेना सचिव संजय मोरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनानुसार पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख,माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या पुढाकारातून मनसेचे महानगर सचिव नितीन काळे, व्यापारी सेनेचे राज्य उपाध्यक्ष पंढरी पवार, विनय कदम, उत्तर रायगड मनसे रोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत कदम, सुनीता सोनवणे, पनवेलचे उपतालुकाध्यक्ष राकेश भोईर, खारघरचे शहराध्यक्ष प्रणव कारखानीस, पनवेलचे उपतालुकाध्यक्ष कैलास माळी, पनवेलचे उपतालुकाध्यक्ष विश्वास पाटील, पनवेल तालुका सचिव दिनेश मांडवकर, विभाग अध्यक्ष विद्याधर चोरगे, नितीन जीवने, साद पटेल, साद नागे, अक्षय पाटील यांसह इतरही मनसे कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
याप्रसंगी पनवेल शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, उरण उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे, महानगर संघटक मंगेश रानावडे, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे, महेश सावंत, तळोजे शहर प्रमुख विशाल पवार, विभाग प्रमुख राकेश गोंधळी, प्रकाश म्हात्रे , उपतालुकाप्रमुख सतीश पाटील, कळंबोली महिला शहरप्रमुख ज्योती पाटील, अरफात पटेल व इतर शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.
Comments