शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाच्या रायगड कक्ष जिल्हाप्रमुख उरण व पनवेलपदी विनय कदम यांची नियुक्ती..
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः बाळासाहेब भवन, मुंबई येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अॅड. अरुण जगताप अध्यक्ष शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष व उपनेते यांनी विनय चंद्रकांत कदम यांची रायगड कक्ष जिल्हा प्रमुख ( उरण व पनवेल ) पदी नियुक्ती केली, व शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
त्यावेळी रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना रामदास शेवाळे शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे सचिव अनिल पुरंदरे तसेच रत्नागिरी जिल्हा कक्ष संपर्क प्रमुख संजय सावंत व उपकार्यालय प्रमुख भावेश भानुशाली उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकारी याचे अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
फोटो ः विनय कदम यांची नियुक्ती