महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण - लोकनेते रामशेठ ठाकूर
महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती - ‘भाजपा सांस्कृतिक महोत्सवा’तून साजरी  



पनवेल (प्रतिनिधी) आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण आहे. यामध्ये परंपरा, कला, संगीत, नृत्य, शिक्षण, सण-उत्सव, खाद्यसंस्कृती, वेशभूषा, साहित्य आणि भाषेचा सुंदर संगम आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे कर्तृत्व मोठे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथे केले. 
         महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून दिनांक ०१ ते ०४ मे रोजी पर्यंत खारघर भाजपच्यावतीने खारघर मधील सेक्टर १२ येथील गावदेवी मैदानावर मनोरंजन, इतिहास, कला तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील मिसळ महोत्सवाचा संगम असलेला 'भाजपा सांस्कृतिक महोत्सव' आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते. 

        यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत,  कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, हर्षदा उपाध्याय, साधना पवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दीपक शिंदे, विजय पाटील, वासुदेव पाटील, युवा मोर्चाचे खारघर अध्यक्ष नितेश पाटील, संतोष शर्मा, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, अमर उपाध्याय, यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

          या महोत्सवात इतिहास प्रेमींसाठी शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी ९० कलाकारांच्या संचातर्फे ‘महाराष्ट्राची महासंस्कृती’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात महाराष्ट्राच्या विविध भागातील परंपरागत नृत्य, लोककला, संगीत, तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याचे जिवंत सादरीकरण करण्यात आले. "महाराष्ट्राची महासंस्कृती" या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंगीत, कोळीगीत, गणगवळणी, लावणी, पालखी, अभंग, पोवाडा, बहुरंगी संगीत आणि नृत्य रचनांनी मंत्रमुग्ध होतानाच विशेषतः यावेळी सादर झालेला "शिवराज्याभिषेक सोहळा" उपस्थितांना महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव देऊन गेला. तसेच या महोत्सवात चारही दिवस सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत कोल्हापूर, सातारा, वऱ्हाडी, नाशिक, मुंबई, पुणेरी चविष्ट मिसळ महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे. 

          लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर व खारघर भाजपचे कौतुक केले. फक्त मनोरंजनच नाही तर शिवकालीन शस्त्र प्रदर्शन तसेच संस्कृतीची जोड या महोत्सवात देण्यात आली आहे. आयोजन अत्यंत सुंदर आणि नियोजनबद्ध असल्याने राज्याचा नव्हे तर राष्ट्रीय कार्यक्रम असल्याचे अधोरेखित होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राची संस्कृती आपण जन्मजात जगत आहोत त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान प्रत्येकाला आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगत महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
Comments