स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती पनवेलमध्ये साजरी...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती पनवेलमध्ये साजरी
पनवेल वैभव / दि.२८ (वार्ताहर): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती पनवेल परिसरात बुधवारी साजरी झाली. या निमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील सावरकर चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
              आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण केले. अभिवादनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे उत्तर जिल्हा रायगड अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, सुनील बहिरा, दादा भोईर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहकर, सुनंदा पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, भाजप सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, चिटणीस प्रशांत शेट्टे, उपाध्यक्ष केदार भगत, रुपेश नागवेकर, श्री मोरबाले, पत्रकार संजय कदम, ऍडव्होकेट मनोज म्हात्रे, केशव स्मृती पतपेढीचे महेंद्र गोडबोले, वरिष्ठ व्यवस्थापक विनिता जोशी, सुशांत पाटणकर, तेजस वाडकर, ज्योती देशमाने, स्वाती कोळी, अंजली इनामदार, ओबीसी सेल महिला तालुका अध्यक्ष कविता पाटील, ज्योस्त्ना माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो: स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image