पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे अवैध धंद्यांवर कारवाई
पनवेल वैभव, दि.11 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्यांना चांगलाच दणका दिला आहे.
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 प्रशांत मोहिते, सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभागाचे अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे व त्यांच्या पथकाने हद्दीतील कोनगाव, वावंजे, वाकडी, नेरे या भागामध्ये कोंबींग आपरेशन दरम्यान अवैध दारू विक्री, एन डी पी एस इत्यादी अवैद्य धंद्यांवर कारवाया केल्या. तसेच खारपाडा टोलनाका येथे नाकाबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर मोटर वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.
फोटो ः वाहनांची तपासणी