जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील पोतदार यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाच्या विरोधात घंटानाद
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील पोतदार यांच्या नेतृत्वाखाली आज पनवेल शहरातील टपाल नाका येथील महावितरणाच्या कार्यालयासमोर त्यांच्या भोंगळ कारभाराविरोधात घंटानाद करण्यात आला.
पनवेल कोळीवाडा येथिल मच्छीमार जनार्दन भोईर यांच्या निवासस्थानी पुर्वी महावितरणाने विदयुत मिटर दिला होता परंतु कोरोना काळात प्रकृती बरी नसल्याने ते मुलाकडे रहायला गेले होते त्या दरम्यान महावितरणाने त्यांचा मिटर काढुन नेला. आता त्यांची तब्येत बरी झाल्यावर जनार्दन भोईर हे पनवेल महावितरणाचे प्रभारी अधिकारी सातपुते व इंजीनियर सावंत यांना भेटुन माझ्या घरी लावलेला मिटर आपण काढलात परंतु मी माझे पेंडीग बिल भरायला तयार आहे. त्या वेळी मला ऑनलाईन पेमेन्ट भरून व मला 25000 हजाराची वायर पण महावितरण कडुन आणायला जनार्दन भोईर सांगितले. ती त्यांनी आणली देखील तरीही महावितरणाचे अधिकारी व इंजीनियर यांनी माझ्याकडे पैसे मागितले. तरच आम्ही मिटर बसवु ते म्हणाले माझी ऐपत नाही त्यामुळे जनार्दन भोईर यांनी संपुर्ण प्रकरण झालेला मनस्ताप व खर्च याचा लेखाजोमा जनता दल सेक्युलर सचिव सुनिल पोतदार यांच्याकडे लेखी तक्रार केल्याने सदर प्रकरणी महावितरणाचे मुजोर अधिकारी व इंजीनियर यांच्या कार्यालयावर महाराष्ट् दिनी घंटा नाद करून आपला निषेद नोंदवीला या वेळी कोळी समाजाच्या महीला व युवक मोठ्या संखेने उपस्थीत राहुन घंटा नाद करण्यात आला.
कोट
आज आम्ही घंटानाद केला आहे जर कोळी बांधवांना न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु.
सुनील पोतदार, प्रदेश सचिव, जनता दल
फोटो ः घंटानाद आंदोलन