कोप्रान फार्मा लिमिटेड कंपनीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अनावरण...
कोप्रान फार्मा लिमिटेड कंपनीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अनावरण...
पनवेल / प्रतिनिधी : -
सावरोली येथील कोप्रान फार्मा लिमिटेड कंपनीत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संघटनेचे सल्लागार तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी झाले. यावेळी आमदार ठाकूर यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद लावणार असल्याची ग्वाही दिली. 
सावरोली येथील कोप्रान फार्मा कंपनीतील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्विकारले आहे. त्या पर्श्वभुमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी द्वारसभा आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगीतले की, "कंपनी व्यवस्थापन जर कामगारांना न्याय देत असेल, तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत जर व्यवस्थापनाने कामगारांना धमकावण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना वठणीवर आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, असा स्पष्ट इशारा दिला तसेच "ज्या कामगारांनी युनियनवर विश्वास ठेवला आहे, त्यांचा विश्वास आम्ही निश्चितपणे सार्थ ठरवणार तसेच कामगारांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी संघटना नेहमीच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवी नाईक, संघटक रवींद्र कोरडे, विश्वास पाटील, भाजपचे खालापूर पूर्व मंडळ अध्यक्ष सानी यादव, उरण तालुका कामगार आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत कडू, रोहिदास घोसाळकर, अमर घोसाळकर, रणजित सावंत, विजय वैलमारे यांच्यासह पदाधिकारी, कामगार आणि मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image