खारघर शिवसेना उपशहरप्रमुखपदी हेमंत ब्रिजेश सिंह यांची नियुक्ती...
खारघर शिवसेना उपशहरप्रमुखपदी हेमंत ब्रिजेश सिंह यांची नियुक्ती
पनवेल वैभव, दि.18 (वार्ताहर) ः हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी खारघर उपशहरप्रमुखपदी हेमंत ब्रिजेश सिंह यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र खा.श्रीरंग बारणे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल, तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेवून कार्य कराल असा विश्‍वास यावेळी खा.श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. 
या नियुक्तीवेळी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे व खारघर शहरप्रमुख प्रसाद सावंत आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.



फोटो ः शिवसेना नियुक्तीपत्र देताना खा.श्रीरंग बारणे
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image