दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांना सीबीएससी पॅटर्न चे प्रशिक्षण..
दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांना सीबीएससी पॅटर्न चे प्रशिक्षण..
पनवेल ता.30(बातमीदार) शिक्षण प्रक्रियेला चालना देण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंडळाने ता.25 व 26 एप्रिल  रोजी दिल्ली पब्लिक स्कूल पनवेल व  इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटरीएट ट्रेनिंग अँड मॅनेजमेंट (ISTM) यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली पब्लिक स्कूल पनवेल या ठिकाणी प्रशिक्षकांच्या व्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्घाटन सीबीएसईच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या पुणे च्या उपसचिव  डाॅ. मृदुला सिंग यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेला आयएसटीएमचे उपसंचालक  विश्वजित बॅनर्जी, यशदाचे माजी संचालक डॉ. सुनील धापटे आणि दत्ता मेघे वर्ल्ड अकादमी, ऐरोलीचे प्राचार्य राजीव गर्ग यांच्यासह मान्यवर वक्ते उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्राचार्य, उपप्राचार्य, वरिष्ठ समन्वयक आणि प्रशिक्षक असे एकूण 82 मान्यवर व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
या प्रशिक्षण कार्यशाळेत नाविन्यपूर्ण प्रशिक्षण पद्धती, शिक्षणाच्या चार पद्धती, ई-सामग्री विकास चक्र, राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 220 आणि अनुभवात्मक शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश म्हणजे या ठिकाणी शिकून गेलेले प्रशिक्षक आपल्या शाळेतील इतर प्रशिक्षकांना सीबीएससी पॅटर्न चे ज्ञान देतील,जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकवण्यात कुठल्याही प्रकारची अडचण न येता शाळेचा निकाल वाढवण्यास मदत होईल.
या कार्यशाळेमुळे केंद्रीय शिक्षण मंडळ आणि आयएसटीएमने उत्तम शिक्षण आणि शिक्षकांच्या ज्ञानात भर पडून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणार आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि कौशल्ये वापरून प्रशिक्षक स्वयंपूर्ण होतील हे या कार्यशाळेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या कार्यशाळेमुळे सीबीएससी शाळांचा निकाल महाराष्ट्राच्या शैक्षणिकपटलावर आपला ठसा उमटवणार आहे असा विश्वास प्रशिक्षणार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image