सेल बेस थेरेपीने ऑटोइम्यून रोगावरही यशस्वी उपचार
नवी मुंबई (पनवेल वैभव): पॉलीमायोसिटिसचे निदान झालेल्या केनीयातील १५ वर्षीय शॅननवर मुंबईत यशस्वी उपचार करण्यात आले. स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. प्रदीप महाजन यांच्या नेतृत्वाखाली सेल बेस थेरेपीचा वापर करुन या रुग्णाला आजारातून मुक्त करण्यात डॅाक्टरांना यश आले. पॉलीमायोसिटिस या आजारामध्ये सुरुवातीला कमरेच्या वरचे स्नायू कमकुवत होतात. यानंतर ते हळूहळू संपूर्ण शरीरात पसरते. यामुळे रुग्णाला अशक्तपणासारखी समस्या सतावू लागली. तिला चालणे, बोलणे तसेच दैनंदिन कामं करणे देखील अशक्य होऊ लागले होते.
एकेकाळी शाळा आणि रोजच्या दिनक्रमाचा मनसोक्त आनंद घेणाऱ्या १५ वर्षीय शॅननला अचानक सर्दीसारखी ऍलर्जी झाली आणि लवकर त्याचे रुपांतर एका गंभीर आजारात झाले ज्यामुळे ती अंथरुणाला खिळली. तिच्या पायांमधील संवेदनशीलता कमी होऊ लागली, तिला तीव्र वेदना होत होत्या, हालचाल करण्यात अडचण येत होती आणि खाण्यापिण्यासारख्या मूलभूत कामांमध्येही तिला आधाराची गरज भासत होती. केनियातील डॉक्टरांनी अनेक चाचण्या करूनही तिच्या आजाराचे मुळ कारण ओळखू शकले नाहीत. शॅननची आई आपल्या मुलीची ही अवस्था पाहून अतिशय चिंताग्रस्त झाली होती.
मार्चच्या सुरुवातीला भारतातील डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर, शॅनन आणि तिच्या आईने पुढील उपचारांसाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. स्टेमआरएक्स रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉ. प्रदीप महाजन यांनी केलेल्या तपासणीत शॅननला पॉलीमायोसिटिस हा एक ऑटोइम्यून रोग( स्वयंप्रतिकार रोग)असल्याचे समजले, ज्यामुळे तिच्या स्नायुंना सूज आली होती.
स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन संशोधक डॉ. प्रदीप महाजन म्हणाले, शॅननचे प्रकरणे हे अतिशय गुंतागुंतीचे होते कारण तिला पॉलीमायोसिटिसचे निदान झाले होते, हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे ज्यामुळे स्नायूंमध्ये तीव्र सूज येते. तिच्या आजारामुळे तिला अर्धांगवायू, मोटर स्किल्स कमी होणे आणि अगदी दैनंदिन कामांना करिता देखील तिला इतरांवर अवलंबून रहावे लागत होते. या आजाराचे निदान आव्हानात्मक होते, परंतु सखोल तपासणी आणि प्रगत रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या माध्यमातून आम्ही तिच्या लक्षणांचे मूळ कारण ओळखू शकलो. स्टेमआरएक्समध्ये, आमच्या स्टेम सेल थेरेपीद्वारे उपचार, टार्गेटेड फिजिओथेरपी आणि न्यूरो-रिहॅबिलिटेशनचा वापर करून खराब झालेले स्नायू, ऊतींची पुनर्निमिती करणे आणि मोटर स्कील्सला चालना देण्यात आली, जे शॅननच्या अतिशय गरजेचे होते.
डॉ. महाजन पुढे सांगतात की, शॅननच्या उपचारांमध्ये एक वेगळी गोष्ट म्हणजे केवळ लक्षणे व्यवस्थापित करण्याऐवजी तिच्या आजाराच्या मूळ कारणांना शोधून ते समुळ नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्टेम सेल थेरपीद्वारे तिच्या शरीराला पुन्हा नव्याने उर्ज आणि गती मिळाली. उपचारांना प्रतिसाद देत तिच्या स्नायूंमधील बळकटी, अवयवांमधील समन्वय साधणे आणि तिच्या भावनिक आरोग्यातही लक्षणीय सुधारणा दिसून आली. शॅननवरील यशस्वी उपचार हे ही स्टेम सेल थेरपीच्या सामर्थ्याची सर्वोत्तम उदाहरण ठरले आहे.
मी कधीच कल्पना केली नव्हती की मी पुन्हा स्वतःच्या पायांवर उभी राहू शकेन, वेदनांशिवाय आयुष्य जगु शकेन मात्र प्रत्यक्षात हे सारे घडत असून . डॉ. महाजन यांनी सेल बेस थेरेपीच्या माध्यमातून नवे आयुष्य मिळवून दिले. मी डॉ. महाजन आणि त्यांच्या टीमची त्यांच्या अत्यंत आभारी आहे. या उपचाराने केवळ माझे शरीरच बरे झाले नाही तर मला आत्मविश्वासही पुन्हा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया शॅननने व्यक्त केली.
शॅननच्या आईने सांगते की, जेव्हा आम्ही पहिल्यांदा स्टेमरएक्समध्ये आलो तेव्हा आम्ही हतबल झालो होतो. शॅननला दररोज अर्धांगवायूशी झुंजताना पाहून आम्हाला अतिशय दुःख व्हायचे. युरोप आणि केनियामधील अनेक डॉक्टरांनी शॅननच्या आजाराचे निदान केले असले तरी, त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही उपचारांमुळे तिला आराम मिळाला नाही. डॉ. महाजन आणि त्यांच्या टीमने आमच्या आयुष्याच आशेचा किरण आणला. आज, माझी मुलगी केवळ शारीरिकदृष्ट्या मजबूत नाही तर भावनिकदृष्ट्या देखील ती सक्षम झाली आहे.