तिहेरी हत्याकांडातील फरार आरोपीला जेरबंद करणाऱ्या सुभाष पुजारी यांचा पोलीस आयुक्तांकडून गौरव
तिहेरी हत्याकांडातील फरार आरोपीला जेरबंद करणाऱ्या सुभाष पुजारी यांचा पोलीस आयुक्तांकडून गौरव

नवरात्रोत्सव बंदोबस्तादरम्यान दाखवली सतर्कता ; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान

पनवेल, दि.२२ (वार्ताहर) : बुलढाणा जिल्ह्यातील खळबळजनक तिहेरी हत्याकांडातील फरार मुख्य आरोपीला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पनवेल शहर वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांचा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तादरम्यान पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात यश आले. पुजारी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि शिताफीची दखल घेत पोलीस आयुक्तांनी त्यांचा गौरव केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाचे सुद्धा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.



फोटो : अधिकारी वर्गांचा सन्मान
Comments
Popular posts
पनवेलमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्याचा मार्ग मोकळा...
Image
आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद ; खिडुकपाडा आदिवासी वाडीत भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी...
Image
२८ आठवड्यांत जन्म, वजन ९०० ग्रॅम, गंभीर गुंतागुंतींवर मात करत बाळ सुखरूप घरी ; मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश...
Image
राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचा रंगमंच पुन्हा सज्ज ; २१ नोव्हेंबरपासून प्राथमिक फेऱ्यांना प्रारंभ...
Image