जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा पनवेल शिवसेने तर्फे तीव्र निषेध..
पहलगाम हल्ल्याचा पनवेल शिवसेने तर्फे तीव्र निषेध

पनवेल वैभव ता.24(बातमीदार) 
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेचा शिवसेना पनवेल यांच्या वतीने जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली ता.23 रोजी संध्याकाळी कामोठे शहरात निषेध करण्यात आला व हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य लवकरात लवकर सुधारावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद, आतंकवादीयों सावधान जाग उठा है नौजवान या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पाकिस्तान ध्वज जाळून घोषणाबाजी करत या दहशतवादी कृत्याबद्दल आपला रोष व्यक्त केला. शिवसेना या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करते. या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. केवळ धर्म विचारून निष्पाप लोकांचे प्राण घेणे हे दहशतवादाचे आणि कट्टरवादाचे अत्यंत निंदनीय स्वरूप आहे. शिवसेनेच्यावतीने हिंसाचाराचा आणि द्वेषपूर्ण कृत्यांचा कठोर शब्दांत निषेध करण्यात आला. या हत्याकांडातील दोषींचा त्वरित अटक खातमा करावा व
काश्मीरमधील निर्दोष नागरिकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची व्यवस्था अधिक मजबूत करावी, केंद्र सरकारने या घटनेचा गांभीयनि दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांना पायबंद घालता येईल व समाजात द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या
कट्टरपंथी विचारांचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यात यावीत अशी मागणी रामदास शेवाळे यांनी यावेळी निषेध व्यक्त करताना केली. शिवसेना देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लढत आलेली आहे.
शिवसेनेच्यावतीने या प्रसंगी मृत्त झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
या निषेध व श्रद्धांजली सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख पनवेल रामदास शेवाळे, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, व इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image