पनवेल वकील संघटनेतर्फे करण्यात आला नवनियुक्त न्यायाधिश कु.वंदना चामले व ॠषिकेश पाटील यांचा सत्कार...
नवनियुक्त न्यायाधिश कु.वंदना चामले व ॠषिकेश पाटील यांचा सत्कार...

पनवेल वैभव, दि.18 (वार्ताहर) ः  पनवेल वकील संघटनेचे सदस्य असलेले नवनियुक्त न्यायाधीश कु. वंदना अरविंद चामले व ऋषिकेश सुनील पाटील यांचा पनवेल वकील संघटनेतर्फे पनवेल न्यायालय येथील वकील रूम येथे सत्कार आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, सचिव प्रल्हाद खोपकर, निवृत्त न्यायाधीश हवेलीकर, ज्येष्ठ वकील सुरेश खानावकर, ज्येष्ठ वकील जगदीश उरणकर, अधिवक्ता परिषद, रायगड जिल्ह्याचे महामंत्री ज्येष्ठ वकील सुनील तेलगे, अ‍ॅड.अरविंद चामले हे प्रामुख्याने हजर होते. सदर प्रसंगी नवनियुक्त न्यायाधीश कु. वंदना अरविंद चामले यांचा सत्कार निवृत्त न्यायाधीश हवेलीकर यांनी केला. तसेच नवनियुक्त न्यायाधीश ऋषिकेश सुनील पाटील त्यांचा सत्कार ज्येष्ठ वकील सुरेश खानावकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त न्यायाधीश कु. वंदना अरविंद चामले व ऋषिकेश सुनील पाटील यांचे पनवेल वकील संघटनेतर्फे अभिनंदन व्यक्त करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. अ‍ॅड. सुरेश खानावकर, अ‍ॅड. अरविंद चामले, अ‍ॅड.जगदीश उरणकर यांनी देखील आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता परिषद, रायगड जिल्ह्याचे महामंत्री ज्येष्ठ वकील सुनील तेलगे यांनी केले. या सत्कार समारंभासाठी अ‍ॅड धनराज तोकडे अ‍ॅड पाटकर, अ‍ॅड भूषण म्हात्रे, अ‍ॅड प्रशांत भुजबख, अ‍ॅड संदीप बटवाल, अ‍ॅड अमित पाटील, अ‍ॅड आर के पाटील, अ‍ॅड इर्शाद शेख आणि इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ः नवनियुक्त न्यायाधिश सत्कार
Comments