कळंबोली: सुधागड एज्युकेशन सोसायटीचे शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आपल्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांचा सेवापुर्ती सोहळा सुधागड विद्या संकुलाच्या वतीने विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी हितचिंतक ,आप्तेष्ट ,नातेवाईक, विद्यार्थी, बालपणीचे मित्र,सहकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या वतीने शाल ,श्रीफळ ,स्मृतीचिन्ह ,सन्मानपत्र देऊन त्यांना सेवापूर्ती समारंभ निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला.
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश भगवान शिंदे हे आपल्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सुरेश शिंदे यांनी बजावलेल्या सेवे करीता त्यांच्या सेवापूर्ती समारंभ कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलाच्या वतीने बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी भूषविले. यावेळी पत्नी अलका शिंदे, सुरेश शिंदे यांची विद्यार्थिनी व कल्याण डोंबिवली महापालिकेतील उपायुक्त वंदना गुळवे, सुधागड शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी मिलिंद जोशी,शिवसेना शिंदे गटाचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक व विद्यालयाचे विद्यार्थी विजय खानावकर, रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भगवान माळी, शासनाचा क्रीडा क्षेत्रातील शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडापटू संजय कडू, मराठी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वनीता कोळी, हिंदी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश पाटील ,इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना कुलकर्णी,तसेच भाऊ-बहीण नातेवाईक मित्र परिवार वर्गशिक्षक, बालपणीचे वर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त अनेक मित्र वर्ग, सहकारी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून सुरेश शिंदे यांचे सहाय्यक शिक्षक ते मुख्याध्यापक पदा पर्यंतच्या शैक्षणिक भरारीचा जीवनातील चढ उताराचा आलेख मांडला. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्य हे विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरित असे असल्याचे यावेळी सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी संबोधले. मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांची मुलगी ही परदेशात असल्याने व्हिडिओ कॉन्फरसद्वारे तिने तिच्या निवृत्त होणाऱ्या वडिलांना शुभेच्छा दिल्या तसेच वडिलांनी आगामी काळ हा समाजासाठी व कुटुंबीयांसाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमानिमित्त सुरेश शिंदे यांना शाल ,श्रीफळ, स्मृतीचिन्ह विद्यालय कडून सप्रेम भेट देण्यात आले. कार्यक्रमा निमित्त मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांनी सांगितले की सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली विद्यालयात सहाय्यक शिक्षक पदापासून काम करण्याची संधी शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये व तत्कालीन प्राचार्य नजीर शेख यांनी मला दिल्याने माझ्या जीवनाचे खऱ्या अर्थाने सोने झाले .माझा सहकारी सर्व परिवार हा माझ्याबरोबर काम करीत असताना जीवाभावाचे ऋणानुबंध जपून वागणूक दिल्यामुळे मी भारावून गेलो आहे .माझ्या सर्व सहकारी मित्र वर्गाचे माझ्याविषयी असलेले प्रेम कधीच विसरू शकणार नाही. कळत नकळत माझ्याकडून काही सहकाऱ्यांची जर मन दुखवली असतील तर तेवढ्याच मोठ्या मनाने माफ करण्याचेही यावेळी त्यांनी आवाहन केले.परिपूर्ण शैक्षणिक सेवा व मनासारखे काम करायला मिळाल्याने मी पूर्ण समाधान पूर्वक सेवानिवृत्त होत असल्याचा अधिक आनंद होत असल्याचे यावेळी सुरेश शिंदे यांनी सांगितले.