कामोठे पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे मोबाईल मालकांना सुपूर्द ...
कामोठे पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे मोबाईल मालकांना सुपूर्द 

पनवेल दि . २० ( वार्ताहर ) - कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले विविध कंपन्यांचे तब्बल ४२ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले.
               या जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत ७ लाख ७३ हजार रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोलीस हवालदार झोळ, पोलीस शिपाई कोकाटे, पोलीस शिपाई इलग आणि पोलीस शिपाई गायकवाड यांच्या पथकाने सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने हे हरवलेले मोबाईल विविध राज्यांतून शोधून काढले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या उपस्थितीत मंगळवारी हे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना वाटप करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी कामोठे पोलीस ठाण्याच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
फोटो -  मोबाईल मालकांना सुपूर्द करताना
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image