पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ ने घेतले मोटार सायकल चोरट्यास ताब्यात ; ११ गाड्या हस्तगत..
पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ ने घेतले मोटार सायकल चोरट्यास ताब्यात ; ११ गाड्या हस्तगत
पनवेल वैभव, दि.27 (संजय कदम) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसर तसेच इतर विभाग परिसरातून मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रकार वाढले होते. या अंतर्गत गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल हे सदर चोरट्याचा शोध घेत असताना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे सदर गुन्हेगार हा पळस्पे परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून आतापर्यंत 11 दुचाकी चोरीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पनवेल शहर पोलीस ठाणे, कामोठे पोलीस ठाणे, खांदेश्‍वर पोलीस ठाणे अंतर्गत मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यापासून वाढले होते. या संदर्भात सपोआ गुन्हे शाखा अजयकुमार लांडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सपोनि प्रवीण फडतरे, अजित कानगुडे, पोउपनि प्रताप देसाई, मानसिंग पाटील, माधव इंगळे, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोउपनि माधव इंगळे, पोहवा रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजीत कानु, रुपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे आदींच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी आदित्य ठाकूर (22) हा पळस्पे परिसरात असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबूल दिली असून त्याने आतापर्यंत 11 दुचाकी चोरीची वाहने दिली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यातील 7 वाहने, 1 कामोठे पोलीस ठाणे, 1 खांदेश्‍वर पोलीस ठाणे, 1 पेण पोलीस ठाणे, आदींचा समावेश आहे. या आरोपीच्या अटकेमुळे अजूनही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
फोटो ः दुचाकी चोर
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image