छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात शेतकरी नामदेव गोंधळी यांची १३ वी भांडाफोड पत्रकार परिषद...
शेतकरी नामदेव गोंधळी यांचा आत्मदहनाचा इशारा


नवीन पनवेल : वावंजे येथील शेतकरी नामदेव गोंधळी यांना गेल्या अनेक वर्षांपासून जमीन फसवणूक प्रकरणात न्याय मिळत नाही, त्यामुळे आता न्याय मिळाला नाही तर विधानभवनात जाऊन आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी सहा मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
       वावंजे येथील जमीन फसवणूक प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. त्यांनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी अशा अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केले मात्र अद्याप देखील न्याय मिळाला नसल्याचे गोंधळी यांनी सांगितले. सरकार दरबारी प्रत्येक पातळीवर त्यांच्या पदरात केवळ आश्वासनेच पडली आहेत. फेब्रुवारी महिन्यात पनवेल मध्ये झालेल्या आमसभेत त्यांनी तीन आमदारांना पत्र देऊन या प्रकरणी न्याय देण्याची विनंती केली होती.  गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केला होता. यावेळी 2019 आधीच अधिसूचना लागलेली असून देखील शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. कॉरिडॉरचे मिळणारे पैसे भल्ला यांना देऊ नयेत अशा प्रकारचा पत्रव्यवहार उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केला असल्याचे गोंधळी यांनी यावेळी सांगितले. अंतिम विजय सत्याचाच होईल सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image