अनियमित ऱ्हदयाच्या ठोक्यांमुळे अंथरुणाला खिळलेल्या ७१ वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार..
मेडट्रॉनिक मायक्रा ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकरचे यशस्वी प्रत्यारोपण

पनवेल वैभव /नवी मुंबई  - : हृदयाचे ठोके हे मिनिटाला ६० पडणे आवश्यक असते मात्र जेव्हा काही रुग्णामध्ये ते अनियमित असतात तेव्हा त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा रुग्णाला ऱ्हदयाचे ठोके नियमित करण्यासाठी पेसमेकर लावला जातो. अशाच एका ७१ वर्षीय रुग्णावर कोणतीही शस्त्रक्रिया, चिरफाड न करता मेडिकवर हॉस्पिटलचे वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. केशव काळे यांच्या नेतृत्वाखाली टिमने मेडट्रॉनिक मायक्रा लीडलेस पेसमेकरचे इम्प्लांट केले. ज्यामुळे हृदयाचे ठोके नियमित होऊन त्याचे प्राण वाचविण्यात डॅाक्टरांना यश आले. रुग्ण आता पूर्णतः बरा झाला असून शस्त्रक्रिया न करता त्याने त्याचे दैनंदिन जीवन पुन्हा सुरू केले आहे.

हृदयाचे ठोके कमी असतील तर ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे श्वास अडतो, चक्कर येते. अशीच घटना खारघर येथील रुग्ण श्री. बिमल तिवारी यांच्यासोबत घडली असून यामुळे हळूहळू त्यांचे दैनंदिन जीवन आव्हानात्मक होऊ लागले. त्यांना कोणत्याही आधाराशिवाय चालणे अशक्य झाले होते आणि  त्यांना मुर्च्छा येऊन पडण्याची भीती वाटत होती. दैनंदिन कामांसाठी त्यांना त्याच्या कुटुंबावर अवलंबून रहावे लागत होते.

श्री तिवारी यांना कोरोनरी अँजिओग्राफी आणि पेसमेकर इम्प्लांटेशनसाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, ही प्रक्रिया त्यांना त्यांचे जीवन परत मिळवून देऊ शकली असती. परंतु  त्याचवेळी डॉक्टरांना आढळले की त्यांना गंभीर थ्रोम्बोसाइटोपेनिया (प्लेटलेट संख्या ६०,००० हून कमी) आहे, ही अशी स्थिती आहे ज्यामुळे त्यांना जीवघेणा रक्तस्त्राव होण्याची शक्यता होती. शस्त्रक्रियेचे उच्च धोके पाहता, पेसमेकर इम्प्लांटेशन शक्य झाले नाही. त्यांची तब्येत आणखी खालावत चालली होती. त्यानंतर त्यांनी मेडिकवर हॉस्पिटलकडे धाव घेतली.

अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना गंभीर स्थितीत त्यांना मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डॉ. केशव काळे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती ओळखून, डॉ. काळे यांनी रात्रीच्या वेळी तात्पुरते पेसमेकर इम्प्लांटेशन केले, ज्यामुळे रुग्ण स्थिर झाला. केवळ ७०,००० प्लेटलेट संख्या असल्याने पारंपारिक पेसमेकर शस्त्रक्रिया खूप धोकादायक ठरली असती. म्हणूनच रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याच्यावर मेडट्रॉनिक मायक्रा लीडलेस पेसमेकर प्रक्रिया करण्याचे निश्चित केले.

*नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलचे वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. केशव काळे सांगतात की,* रुग्णाचा गंभीर थ्रोम्बोसाइटोपेनिया (रक्तातील कमी झालेले प्लेटलेट्स) लक्षात घेता, पारंपारिक पेसमेकर इम्प्लांटेशन करणे हा पर्याय योग्य नव्हता, कारण त्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका होता. मेडट्रॉनिक मायक्रा लीडलेस पेसमेकर हा त्याच्यासाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रगत पर्याय होता. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांशी आणि वैद्यकीय टिम सोबत सखोल चर्चा केल्यानंतर, लीडलेस पेसमेकर निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. पेसमेकर हा ब्रॅडीकार्डियावरचा उपाय असून त्यामुळे हृदयाचे ठोके नियमित होतात. त्यामुळे हृदयाला विजेचे तरंग दिले जातात व त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. कॅथेटरमधून हा पेसमेकर पाठवला जातो व हृदयात बसवला जातो.

*डॉ. केशव काळे पुढे सांगतात की* , हे उपकरण लीडलेस आणि कमीत कमी आक्रमक असल्याने, गुंतागुंत होण्याची शक्यता कमी करते, सुरक्षितता आणि दीर्घकालीन कार्यक्षमता दोन्ही सुनिश्चित करते. लीडलेस पेसमेकर हे असे उपकरण आहेत जे पारंपारिक पेसमेकरच्या विपरीत हृदय गती सामान्य राखतात. लीडलेस पेसमेकरला हृदयाशी जोडण्यासाठी कोणत्याही शस्त्रक्रिया किंवा बॅटरी आणि लीडची आवश्यकता नसते. लीडलेस पेसमेकर हे असे उपकरण आहे जे कॅथेटरद्वारे उजव्या खालच्या हृदयाच्या चेंबरशी थेट जोडलेले असते. त्याला शस्त्रक्रिया आणि लीडची आवश्यकता नसल्यामुळे, रक्तस्त्राव, गुंतागुंत आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. प्रक्रियेनंतर रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी होतो आणि गतिशीलता सुधारते. रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर फारशी काळजी घेण्याची आवश्यक नसते. कॅथ लॅबमध्ये कोणत्याही प्रकारची भूल न देता केल्या जाणाऱ्या या प्रक्रियेसाठी सुमारे 2 तास लागतात. या प्रक्रियेनंतर, रुग्णाला दुसऱ्याच दिवशी रुग्णाला घरी सोडले जाते. पारंपारिक पेसमेकरच्या विपरीत, लीडलेस पेसमेकरसाठी किमान खबरदारी घ्यावी लागते.

हे प्रगत तंत्रज्ञान ब्रॅडीकार्डिया (हृदय गती मंदावणे) व्यवस्थापित करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. श्री तिवारींना त्यांच्या पायावर परत उभे राहून, त्यांचे सामान्य जीवन जगताना पाहणे हे डॉक्टर म्हणून आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस आहे. ही कामगिरी रुग्णालयाच्या वैद्यकीय उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. 

माझ्या या गंभीर आरोग्य स्थितीमुळे मी सर्व आशा गमावल्या होत्या, परंतु मेडिकवर हॉस्पिटलने मला आयुष्य जगण्याची दुसरी संधी दिली. डॉ. केशव काळे आणि त्यांच्या टीमने मला केवळ वाचवले नाही तर माझे स्वातंत्र्य देखील परत मिळवून दिले अशी प्रतिक्रिया रुग्ण श्री. बिमल तिवारी यांनी स्पष्ट केली.
Comments