अज्ञात व्यक्तींकडून पैशाची मागणी ; आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार ...
अज्ञात व्यक्तींकडून पैशाची मागणी ; आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार 

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींकडून अनेकांना फोन करून पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 
        आमदार प्रशांत ठाकूर यांचे नाव वापरून काही अज्ञात व्यक्ती व्यक्तींना फोन करून पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले. दूरध्वनी करणारे व्यक्ती पंजाबी भाषेत बोलत होते आणि आमदार ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे मागत होते. ज्या नागरिकांना संशय आला, त्यांनी या व्यक्तींना जाब विचारताच त्यांनी फोन बंद केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार ठाकूर यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, ३ मे रोजी मला माझ्या नावाने पैशांची मागणी करणारे फोन आल्याची माहिती मिळाली. फोन करणारे पंजावी भाषेत बोलत होते आणि माझ्या नावाने पैसे मागत होते. दूरध्वनी आलेल्या व्यक्तीने शंका व्यक्त करताच त्यांनी फोन बंद केला. त्यामुळे सावधगिरी म्हणून मी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझ्या नावाने इतर कोणाला फोन आल्यास मला कळवा किंवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
Comments
Popular posts
बेलपाडा प्रकरणाची महसूल मंत्र्यांकडून दखल ; आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला गती...
Image
आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या निधीतून साकारलेल्या महर्षी वाल्मिकी समाज सभागृहाचे जयंतीदिनी लोकार्पण....
Image
भीमाशंकर येथील झाडांच्या विनाशाबद्दल पनवेलच्या निसर्ग प्रेमींची मूक निदर्शने...
Image
वैश्य युवा सामाजिक संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ; खोपोलीत विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
Image
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी - व्यवसायाचा मार्ग मोकळा ; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या बैठकीत महत्त्वाचे आश्वासन...
Image