वैश्य युवा सामाजिक संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ; खोपोलीत विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
वैश्य युवा सामाजिक संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 
खोपोलीत विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
 पनवेल / प्रतिनिधी  - : 
वैश्य युवा सामाजिक संस्था, खोपोली यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन सोहळा२४ ऑक्टोबर रोजी श्रीराम मंगल कार्यालय, खोपोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील इयत्ता पहिलीपासून उच्च पदवीपर्यत शिक्षण घेऊन यश संपादन करणाय्या गुणवंत विद्यार्थ्याचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवतेला प्रोत्साहन देण्यासोबतच समाजबांधवांमध्ये एकोपा, स्नेह आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.              
कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थांनी वैश्य युवा सामाजिक संस्था, खोपोलीचे अध्यक्ष तथा नगरसेवक विनायक तेलवणे होते. ज्येष्ठ सामाजिक नेते लक्ष्मण चौधरी व सुनीता चौधरी, वैश्य समाजांचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष अशोक भोपतराव, उद्योजक परेश वाणी व प्रियांका वाणी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विनायक तेलवणे, सेक्रेटरी मंगेश चौधरी व संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सेक्रेटरी मंगेश चौधरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून समाजबांधवांनी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, तसेच संस्थेच्या माध्यमातून लोकहिताची कामे करण्याचा मानस असल्यांचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा गौरव हा कार्यक्रमांचा मुख्य आकर्षणबिंदू ठरला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक स्तरांवर उत्तीर्ण झालेल्या समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्रे आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतूक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
       
कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक तेलवणे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येण्यांचे आवाहन केले. समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रावीण्य मिळवले असून, त्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी सर्वजण एकत्र आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. भविष्यातही समाजबांधवांनी एकजूट कायम ठेवून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान दयवे. आपाण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाने जपावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी समाजबांधवांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तीन सोन्याच्या नथी, तीन पैठणी साडया आणि तीन मनगटी घड्याळे अशी वक्षिसे ठेवण्यात आली होती. लकी ड्रॉमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातवरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी जॅकपॉट बक्षिसासाठी चिट्ठी काढून विजेत्यांचे नाव घोषित करण्यात आले.
       
राजेंद्र फके यांनी आपल्या मनोगतात 'जय वैश्य'चा नारा अधिक बुलंद करण्यांचे आवाहन केले. समाजाच्या एकतेसाठी आणि प्रगतीसाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे सांगितले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष विनायक तेलवणे, उपाध्यक्ष संतोष चौधरी, सेक्रेटरी मंगेश चौधरी, सहसेक्रेटरी राकेश दवके, खजिनदार सचिन महाजन, सहखजिनदार अमोल मलबारी, तसेच संतोष चौधरी, प्रशांत सोनटक्के, नितीन गोरी, सचिन ठेकेकर, संतोष गोरी, दीपेश चौधरी, हेमंत तेलवणे, भगवान दवके, रामकृष्ण तेलवणे, सुनील तेलवणे, परेश वाणी आणि तेजस चौधरी यांच्यासह विविध समाजबांधव व महिलांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन पोटे सर यांनी केले.
Comments
Popular posts
बेलपाडा प्रकरणाची महसूल मंत्र्यांकडून दखल ; आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला गती...
Image
आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या निधीतून साकारलेल्या महर्षी वाल्मिकी समाज सभागृहाचे जयंतीदिनी लोकार्पण....
Image
भीमाशंकर येथील झाडांच्या विनाशाबद्दल पनवेलच्या निसर्ग प्रेमींची मूक निदर्शने...
Image
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी - व्यवसायाचा मार्ग मोकळा ; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या बैठकीत महत्त्वाचे आश्वासन...
Image