पीएनजीचे पोल्मी, प्रथा, कथा, सप्तम, इना हे लोकप्रिय कलेक्शन सादर...
यंदा खास कलेक्शन्ससह पीएनजी सोबत साजरा करा गुढीपाडवा....
मुंबई,(पनवेल वैभव)२७ मार्च २०२५ : महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएनजी ज्वेलर्सने नववर्षाच्या निमित्ताने आपले खास कलेक्शन सादर केले आहेत, ज्यात पोल्मी, प्रथा, कथा, सप्तम आणि इना या कलेक्शन्सचा समावेश आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने 24 मार्च ते 30 एप्रिल 2025 दरम्यान सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या स्टोरमध्ये ग्राहकांसाठी आकर्षित सवलती दिल्या जाणार आहेत.

गुढीपाडवा हा नवीन वर्षाची आणि समृद्धतेची सुरुवात मानला जातो. या शुभप्रसंगी पीएनजी ज्वेलर्सच्या मोहिमेत पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारातील सोने, चांदी, हीरे, आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांवर खास सवलती देण्यात आल्या आहेत. लग्नसराई सारख्या महत्वाच्या प्रसंगांसाठी, सणासुदीला भेटवस्तू देण्यासाठी, वैयक्तिक सौंदऱ्यासाठी या किंवा सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

गुढीपाडवा मोहिमेसाठी सादर करण्यात आलेलं  मुख्य कलेक्शन म्हणजे पोल्मी, पारंपरिक पोल्की ( अनकट ) हीरे, पुरातन कारागिरी यांचा संगम असलेले दागिने हे राजेशाही सौंदर्य आणि आधुनिक आकर्षण यांचे प्रतीक आहे. या कलेक्शन मधील प्रत्येक दागिना हा राजेशाही देखावा प्रदान करत असून सर्वांना परवडणारा तसेच प्रत्येक स्त्रीला तिचे सौंदर्य जपण्याची संधी प्रदान करणार आहे. 

डॉ सौरभ गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, पीएनजी ज्वेलर्स यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली,“सोन्याच्या किंमती उच्चानकी पातळीवर पोहचत असून देखील ग्राहक त्याच उत्साहाने खरेदी करत आहेत. ग्राहक जुने सोने बदलून नवीन दागिने खरेदी करत आहेत, जेणेकरून त्यांना आर्थिक स्थिरता मिळते तसेच सणासुदी किंवा लग्नसराईच्या दागिन्यांची देखील खरेदी होते. गुढीपाडवा हे नव्या वर्षाची सुरुवात असल्याने पारंपरिक आणि स्टडेड दागिन्यांना अधिक महत्व दिले जाते. तसेच सध्या सुरू असलेली महाराष्ट्रीय लग्नसराईमुळे  ही मागणी आणखी वाढवत आहे. भारतात सोनं हे फक्त किंमतीवर नाही तर भावनिक आणि शुभ प्रसंगी खरेदी केलं जातं. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा सर्वांसाठी तेजस्वी आणि उत्साही असेल असा आमचा विश्वास आहे.”     .

या गुढीपाडव्याला खास बनवण्यासाठी पीएनजी ज्वेलर्स ने जुन्या सोन्याच्या बदल्यावर ०% कपात, सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसमध्ये ३०% पर्यंत सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसमध्ये १००% पर्यंत सूट दिली आहे. या नववर्षाला आणखी आनंदमय करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या पीएनजी ज्वेलर्स स्टोअरला किंवा पीएनजी ज्वेलर्सच्या ऑनलाइन वेबसाईटला भेट द्या असे नागरिकांना आवाहन या निमित्ताने पी एन जी तर्फे करण्यात आले.
Comments