वृध्दाश्रमांना भेट देऊन आंतरराष्ट्रीय वैश्य फेडरेशन रायगडच्यावतीने 'वैश्य एकता दिवस साजरा'
पनवेल वैभव /प्रतिनिधी - : आंतरराष्ट्रीय वैश्य फेडरेशन रायगड यांच्या वतीने वैश्य एकता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सदस्यांनी श्री समर्थ सामाजिक विकास सेवाभावी संस्था संचालित राजाश्रय वृद्धाश्रम रसायनी, मोहोपाडा व सेवागंण वृद्धाश्रम पेण येथे भेट देऊन वयोवृद्धांची चर्चा केली. त्यांच्याबरोबर समन्वय साधत असताना त्यांचे डोळे अक्षरशः पाणावले होते. गिटार वादक प्रितेश चौधरी यांनी सर्वांना गिटार वाजून मंत्रमुग्ध केले. 95 वर्षाच्या आजी सुद्धा गाण्यांवर नाचत होत्या. यावेळी त्यांना ब्लँकेट आणि फळे वाटप करण्यात आले.
भेटी दरम्यान काही वृद्धांनी आपण वृद्ध आहोत व आपल्याला आपल्या कुटुंबापासून वेगळे ठेवलेले आहे या गोष्टीची जाणीव विसरून ते सर्व वृद्ध या कार्यक्रमामध्ये समाविष्ट झाले होते. त्यातील काही वृद्धांनी कविता, गाणी गायली. राजाश्रय वृद्धाश्रम येथील शुभश्री भोईर यांनी सागितले की, अनेक जण वृद्धाश्रमाला भेट देतात आणी निघुन जातात पंरतु आपण त्यांना आपलस केलत. तसेच स्नेहांगण वृद्धाश्रम पेण येथील पटवर्धन यांनी सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. वैश्य एकता दिवस कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय फेडरेशन रायगड जिल्हा महिला अध्यक्ष हर्षला तांबोळी, आंतरराष्ट्रीय वैश्य फेडरेशन रायगड जिल्हा अध्यक्ष कैलास पोटे,आंतरराष्ट्रीय वैश्य फेडरेशन रायगड सेक्रेटरी सुभाष तांबोळी, आंतरराष्ट्रीय वैश्य फेडरेशन रायगड खजिनदार सुनील भोपतराव, वैश्य समाज रायगड युवक मा.अध्यक्ष उदय मनोरे,आंतरराष्ट्रीय वैश्य फेडरेशन रायगड सल्लागार दत्तात्रय तांबोळी,आंतरराष्ट्रीय वैश्य फेडरेशन कार्यकारणी सदस्य योगेश तांबोळी, विवेक आंग्रे, सूर्यकांत गुप्ता, प्रकाश मनोरे, राजन चौधरी, राजेंद्र चौधरी, सचिन झिंजे, विजय तांबोळी, नरेश तांबोळी, शिव सेवक गुप्ता , प्रितेश चौधरी,श्रीमती सीमा तांबोळी श्रीया विवेक आंग्रे, सचिन झिंजे, मयूर मनोरे, अंकेश मनोरे,दर्पण गुप्ता, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.