तळोजातील बेपत्ता चिरमुडीच्या हत्येप्रकरणी आरोपी अटक...
तळोजातील बेपत्ता चिरमुडीच्या हत्येप्रकरणी आरोपी अटक...
पनवेल वैभव, दि.27 (संजय कदम) ः तळोजा देवीचा पाडा येथील 2 वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह राहत्या घरातील बाथरुमच्या वर सुटकेसमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला होता. सदर मुलीच्या हत्येप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात तळोजा पोलिसांनी यश आले आहे.
हार्षिक अमलेश शर्मा (वय 2, रा. तळोजा देवीचा पाडा) असे मृत मुलीचे नाव असून ती मंगळवारपासून (दि.25) बेपत्ता होती. मृत मुलगी तिच्या आई वडिलांसह देवीचा पाडा येथे राहत होती. ती मंगळवारी खेळण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी तळोजा पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, आज तिचा मृतदेह राहत्या घरात बाथरूमवरील पोटमाळ्यावरील सुटकेसमध्ये ठेवल्याचे आढळून आले. 
पोट माळ्यावरून वास येऊ लागल्याने पाहणी केली असता मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला. तळोजा पोलीस व क्राईम बँचच्या यांनी एकत्रितपणे तपास सुरू केला असता सदर मुलीच्या घरासमोर राहणारा मोहम्मद अन्सारी याला ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता भांडणातून व पैशाच्या हव्यासापोटी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर मुलीची आई मुलीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर गेली असता मोहम्मद अन्सारीने सदर मुलीला ठार मारुन सुटकेसमध्ये टाकून ती सुटकेस बाथरुमच्या वर ठेवली होती, अशी माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. याबाबत पुढील तपास तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत करीत आहेत.
Comments