प्रितेश हरिप्रसाद साहू यांची युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिवपदी निवड
पनवेल वैभव / प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली लाल महल, पुणे ते मुंबई विधानभवनाकडे निघालेल्या 'युवा आक्रोश' पदयायात्रा युवकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
ही पदयात्रा महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक शांतता आणि यांसारख्या महत्वाच्या विषयांवर सरकारला जाग आणण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांना न्याय मिळावा, महिलांना सुरक्षित वाटावे, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन मिळावे, तसेच राज्यात सामाजिक एकता आणि शांततेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, या प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसने ही पदयात्रा काढून सरकारला जाग आणली.
तर विधानसभा निवडणुकी हतबल झालेल्या युवकांना कामं करण्याची नवीन संधी मिळावी पक्ष वाढीसाठी नवीन संजीवनी मिळावी यासाठी युवक काँग्रेस मध्ये पदोन्नती करत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, पक्ष वाढीसाठी प्रितेश हरिप्रसाद साहू यांची युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव पदी निवड केली आहे.