शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या सौजन्याने ममता चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या सौजन्याने ममता चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न
पनवेल वैभव, दि.17 (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या सौजन्याने ममता चषक महिला टर्फ बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
या ममता चषक महिला टर्फ बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या आयोजक प्रभाग 20 च्या विभाग संघटीका रेश्मा कुरुप या होत्या. याप्रसंगी शहरप्रमुख प्रवीण जाधव, उपजिल्हा संघटीका सकपाळ, युवा सेना जिल्हाध्यक्ष पराग मोहिते, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, महिला शहर संघटीकाअर्चना कुळकर्णी, उपशहर संघटीका उज्वला गावडे, विभाग संघटीका अश्‍विनी देसाई, युवा सेना शहरप्रमुख निखिल भगत, पत्रकार राजेंद्र पाटील, विभागप्रमुख अमित माळी, अमित परसाळे, उपविभागप्रमुख केशल भगत, शाखा प्रमुख राकेश भगत, संतोष तळेकर, प्रदीप माखीचा आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये हार्मोनी वॉरियर या महिला संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक ड्रीम 25 या संघाने पटकाविला.
फोटो ः क्रिकेट स्पर्धा
Comments