लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन..
लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन..
पनवेल वैभव /दि.२७(वार्ताहर) रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लब च्या वतीने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी येत्या शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे.
                आजच्या धावपळीच्या युगात.. वाढणारी  वाहनांची वर्दळ... होणारी ट्रॅफिक.. आणि त्यावर नियंत्रण करण्याकरिता वाहतूक पोलीस हे नेहमीच उन्हातानात रस्त्यावरती आपलं कर्तव्य बजावत असतात..पण वेळेची देखील मुभा असल्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे शक्य होत नसते.. त्याचबरोबर देशाचा चौथा आधारस्तंभ हा देखील समाजासाठी दिवस रात्र झटत असतो.. आणि या पत्रकारांना देखील स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ नसतो यालाच अनुसरून मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पनवेल आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश जी देशमुख, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, मेडी. डायरेक्टर लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट चे प्रसिद्ध नेत्रचिकिस्तक डॉक्टर सुहास हळदीपुरकर, पनवेल वाहतूक शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे याचबरोबर भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तर या कार्यक्रमासाठी  विशेष उपस्थितीमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर , मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव मनोज खांबे रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे हे उपस्थित असतील.

कोट:
पनवेल परिसरातील प्रमुख सिग्नल चौकामध्ये आरोग्य तपासणी चे वाहन जाणार आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करणार. त्याचबरोबर जर त्यांना अधिक उपचाराची गरज अथवा ऑपरेशनची गरज लागल्यास ते देखील मोफत करण्यात येईल - दत्तात्रय कुलकर्णी पनवेल तालुका प्रेस क्लब , खजिनदार 

कोट:
जास्तीत जास्त पत्रकार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवावं.- पनवेल तालुका प्रेस क्लब अध्यक्ष , प्रशांत शेडगे


फोटो : ऍम्ब्युलन्स
Comments