आ.विक्रांत पाटील यांनी केला दिल्लीचा विजय साजरा
पनवेल वैभव, दि.8 (संजय कदम) ः दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये दिल्लीकरांनी भाजपला मोठी आघाडी मिळवून देत महाविजय साध्य केला आहे. हा सामान्य दिल्लीकरांच्या विश्वासाचा विजय असल्याने आ.विक्रांत पाटील यांनी हा विजय कार्यकर्ते व पदाधिकार्यांना पेढे भरवून जल्लोषात साजरा केला.
हा गर्जनात्मक कौल साजरा करण्यासाठी तुळजापूर येथे आ.विक्रांत पाटील यांनी भेट दिली व आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी सोबत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला. नागरिकांना पेढे भरवून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.
फोटो ः आ.विक्रांत पाटील विजयोत्सव साजरा करताना