पनवेल शहरासह कळंबोलीतून रिक्षाची चोरी...
पनवेल शहरासह कळंबोलीतून रिक्षाची चोरी...


पनवेल दि.१६(संजय कदम ):  पनवेल शहरासह कळंबोली वसाहती मधून रिक्षाची चोरी झाल्याची घटना घडल्याने रिक्षा चालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे. 
             पनवेल शहरातील जुने पोस्ट ऑफिस परिसरात संतोष दाबके यांनी त्यांची रिक्षा उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर रिक्षा चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.तर दुसऱ्या घटनेत केशव टाकरस यांनी त्यांची रिक्षा कळंबोली बस डेपो जवळील रिक्षा स्टँडच्या बाजूला उभी करून ठेवली असता अज्ञात चोरटयाने  सदर रिक्षा चोरून नेल्याने याबाबतची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image