आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला मिळाला आवाज परत..
खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये स्वरयंत्रणेवर केले यशस्वी उपचार..
पनवेल वैभव / नवी मुंबई : नावाप्रमाणेच आवाज ही देखील त्या व्यक्तीची एक ओळख बनून जाते; मात्र काही कारणामुळे स्वरयंत्र म्हणजे वैद्यकीय परिभाषेत व्होकल कॉर्डला काही दुखापत झाली तर ती व्यक्ती आपला आवाज गमावून बसते.  खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉ. फरहा नाज काझी(लॅरिन्गोलॉजिस्ट) आणि डॉ. दीपक खन्ना(हेड अँड नेक सर्जन, व्हॉइस रिस्टोरेशनमध्ये तज्ज्ञ) यांच्या नेतृत्वाखालील टीमने डाव्या बाजूचा व्होकल कॉर्ड पॅरालिसिस (स्वरयंत्रणेचा पक्षाघात) असलेल्या २४ वर्षीय तरुणीवर शहरातील पहिली नॉन-सिलेक्टिव्ह लॉरिन्जियल रीइनर्वेशन प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली, मज्जातंतूस झालेल्या दुखापतीमुळे या तरुणीने तिचा आवाज गमावला होता. सलग २ वर्षांच्या संघर्षानंतर आता ती स्पष्ट बोलु लागली आहे. 

पनवेलमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय अविका सक्सेना (नाव बदलले आहे)* ही आयटी क्षेत्रात काम करते. अचानक तिला तिचा आवाज कमकुवत होत असल्याचे आढळून आले. तिने गेल्या दोन वर्षात अनेक डॉक्टरांची भेट घेतली परंतु तिच्या आवाजात कोणतीही सुधारणा झाल्याचे आढळून आले नाही. त्यानंतर तिने खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलकडे धाव घेतली व आवश्यक तपासणी केल्यानंतर डॉ. फरहा यांनी तिला डाव्या बाजूचा व्होकल फोल्ड  पॅरालिसिस   (स्वरयंत्राचा पक्षाघात) असल्याचे निदान केले.

*मेडिकवर हॉस्पिटलच्या लॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. फरहा नाझ काझी सांगतात की,* व्होकल फोल्ड पाल्सी (VFP) तेव्हा होते जेव्हा व्होकल कॉर्ड नियंत्रित करणाऱ्या नसांवर आघात होतो किंवा काही कारणास्तव त्या कमकुवत होतात. यामुळे कर्कश आवाज, आवाजातील घोगरेपणा अशा समस्या जाणवतात तसेच गिळण्यास त्रास होतो. ही स्थिती स्वरयंत्रावर झालेला आघात, विषाणूजन्य संसर्ग, न्यूरोलॉजिकल विकार किंवा ट्यूमरमुळे उद्भवू शकते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर याचा गंभीर परिणाम होतो. व्हॉइस थेरपी, व्होकल कॉर्ड इंजेक्शन किंवा मेडियालायझेशन थायरोप्लास्टी यासारख्या पारंपारिक उपचारांमुळे तात्पुरता आराम मिळतो परंतु पक्षाघात झालेल्या व्होकल फोल्ड्सचे नैसर्गिक कार्य पुर्ववत होत नाही. लॉरिन्जियल रीइनर्वेशन नावाची प्रक्रिया या प्रकरणात गेम-चेंजिंग ठरली असून स्वरयंत्रणेतील स्नायू आणि मज्जातंतू एकमेकांना जोडून 

आवाजाची गुणवत्ता सुधारण्यात आली. कोणत्याही कोमॅार्बिडीटीज (उदा. मधुमेह) नसलेल्या आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती ही प्रक्रिया करु शकतो. ही प्रक्रिया सुमारे  ३ तास चालली, शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आता पूर्णपणे बरी झाली आहे आणि अवघ्या दोन दिवसांत तिला घरी देखील सोडण्यात आले.

*डॉ. फरहा नाझ काझी पुढे सांगतात की,* पारंपारिक प्रक्रियेच्या तुलनेत ही आधुनिक उपचार पध्दती नक्कीच फायदेशीर ठरते. ही प्रक्रिया स्वरयंत्राच्या मज्जातंतूशी जोडली जाते. ही प्रक्रिया पक्षाघात झालेल्या स्वरयंत्राच्या कार्यास पुर्ववत करण्यास मदत करते तसेच श्वासोच्छवासातील अडथळे दूर करत आवाजाची क्षमता सुधारते. तात्पुरत्या व्होकल कॉर्ड इंजेक्शन्सच्या विपरीत ही प्रक्रिया आवाज परत मिळविण्यास अतिशय फायदेशीर ठरते व यामुळे संबंधीत व्यक्तीच्या आवाजाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. ही प्रक्रिया बोलताना दम लागण्यासारख्या समस्या टाळण्यासही फायदेशीर ठरते.

बायलॅटरल व्होकल फोल्ड पॅरालिसिस किंवा मज्जातंतूचे गंभीर नुकसान झालेल्या रुग्णांना देखील या प्रक्रियेचा फायदा होतो. आवाजाच्या विकारांशी झुंजणाऱ्यांसाठी, ही प्रक्रिया आशेचा किरण ठरत आहे आणि आवाज पुन्हा मिळविण्यासाठी आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही प्रक्रिया प्रभावी ठरत आहे.

मला बोलताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अगदी साध्या शब्दांच्या उच्चाराने देखील मला थकवा जाणवायचा . माझा आवाज गमावल्याने मी माझा आत्मविश्वासही गमावला होता. प्रियजनांशी संवाद साधण्यात येणाऱ्या अडचणी तसेच माझ्या दैनंदिन कामांवरही याचा परिणाम होऊ लागला. परंतु डॉ. फरहा आणि त्यांच्या टीमने मला माझा आवाजच नाही तर माझा आत्मविश्वासही परत मिळवून दिला आहे. मला मिळालेले उपचार आणि प्रोत्साहन हे खरोखरच माझे आयुष्य नव्याने सुरु करण्यास फायदेशीर ठरले. आज मी स्वरयंत्रणेवर कोणताही ताण न अनुभवता पुर्वीसारखी बोलू शकते अशी प्रतिक्रिया रुग्ण अविका सक्सेना (नाव बदलले आहे) हिने व्यक्त केली.
Comments