वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज तळोजात १० कोटींचे अंमली पदार्थ करण्यात आले नष्ट..
वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज तळोजात १० कोटींचे अंमली पदार्थ करण्यात आले नष्ट


पनवेल वैभव, दि.26 (संजय कदम) ः महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज तळोजा 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.
विविध ठिकाणच्या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्याची कारवाई यंत्रणांकडून केली जाते. नवी मुंबई पोलिसांनी विविध दाखल गुन्हयांत यापूर्वी सुमारे 10 कोटींचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला असून सदरचा हा अंमली पदार्थांचा साठा नवी मुंबई पोलिसांकडून आज बुधवार दि.26 फेबु्रवारी रोजी नष्ट केला. यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर व नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तळोजा एमआयडीसी प्लॉट नं-पी-32 येथे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या भूखंडावर हा अंमली पदार्थ नष्ट करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई, दिपक साकोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, पनवेल, अजय लांडगे, गुन्हे शाखा, नवी मुंबई, तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत आदींसह इतर पदाधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ः अंमली पदार्थ नष्ट
Comments