प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा भक्तीभावाने संपन्न...
पनवेल वैभव / दि.25 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील तळोजा मजकूर येथील शिवमंदिराचा जिर्णोद्धार तसेच प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तीभावाने व विविध धार्मिक कार्यक्रम करून साजरा करण्यात येत आहे.
अति प्राचीन सिद्धेश्वर मंदिर जिर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा व कलश रोहण सोहळा श्री सिद्धेश्वर मंदिर तळोजा मजकूर येथे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम राबवून संपन्न होत आहे. यावेळी प्रामुख्याने मुख्य मान्यवर म्हणून योगीराज यशवंत महाराज, बबनदादा पाटील, ह.भ.प.रामदास बुवा, रायगड जिल्हा वारकरी अध्यक्ष ह.भ.प.धनाजी बुवा, कामगार नेते महेंद्रशेठ घरत, जगदीश गायकवाड, रामदास पाटील, बबन केणी, कनिल यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते. यानिमित्ताने पहाटेच्या वेळी काकड आरती, हरिपाठ, महाआरती, कलश शोभा यात्रा, मुर्ती मिरवणूक, मुर्तिप्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा, क्षेत्र पाल पुजन पुर्णाहूती, तसेच विविध भजन मंडळाची भजने, किर्तने आदींचे आयोजन सलग तीन दिवस करण्यात येत असून या निमित्ताने हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सर्वांचे स्वागत निमंत्रक व ग्रामस्थ मंडळ तळोजा मजकूर यांच्या वतीने बबनदादा पाटील यांनी केले. या धार्मिक कार्यक्रमावेळी बबनदादा पाटील यांना बाळासाहेब पंचकृषी पुरस्कार व सद्गुरु वामन बाबा पुरस्कार तळोजा मजकूर व ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
फोटो ः कलशरोहण