प.पू. गगनगिरी महाराजांच्या पालखीचे पनवेल मध्ये स्वागत...
प.पू. गगनगिरी महाराजांच्या पालखीचे पनवेल मध्ये स्वागत
पनवेल वैभव /(वार्ताहर):  परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या मुंबई ते खोपोली पायी पालखीचे पनवेलमध्ये परमपूज्य गगनगिरी महाराज पनवेल भक्त मंडळाने स्वागत करून शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार विक्रांत पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी पालखी सोहळ्यात उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले. 
            महाशिवरात्री निमित्त मुंबई ते खोपोली गगनगिरी महाराज आश्रम येथे जाणारी पायी पालखी दरवर्षी प्रमाणे पनवेल शहरात आली होती. या वेळी गगनगिरी महाराज पनवेल भक्त मंडळाच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत गार्डन हॉटेल येथे करण्यात आले त्यानंतर पालखी पनवेल शहरातील श्री रामेश्वर मंदिरात आरतीचे व पायी पालखीतील भक्ताना अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली या नंतर पालखी खोपोलीच्या दिशेने रवाना झाली.
 या पालखी सोहळ्यात गगनगिरी महाराज पनवेल भक्त मंडळाचे सदस्य तसेच महिला व भक्त गण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी मार्गावर अनेक मंडळ व भक्तीनी पाणी, सरबत याची सोय केली होती.
Comments