वाॅकेथाॅनमध्ये कॅन्सरचा जागर...
उलवे (पनवेल वैभव) ता.९ :
सकाळी पहाटे सहाची वेळ, स्वच्छ हवा, अलोट गर्दीला खिळवून ठेवणारा झुंबा, वाॅकेथाॅनसाठी अबालवृद्धांची धावपळ आणि प्रचंड उत्साह...हे सारे मनाला खिळवून ठेवणारे दृश्य दिसत होते, उलव्यात कॅन्सरच्या जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या वाॅकेथाॅनच्या वेळी...
दिवसेंदिवस कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन दिपीशा कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे उलवे येथे कॅन्सरच्या जनजागृतीसाठी रविवारी(ता.९ ) दिपीशा फौंडेशनच्या संस्थापक डाॅ.दिपाली गोडघाटे यांनी वाॅकेथाॅनचे आयोजन केले होते.
ही वाॅकेथाॅन तीन गटांत झाली.
सहभागींना टी-शर्ट आणि मेडल दिले गेले. उलवे येथील रिलायन्स जिओ इन्स्टिट्यूट टाॅवरजवळ उत्साहात ही वाॅकेथाॅन झाली. उत्तम प्रतिसाद लाभला.
यावेळी प्रमुख पाहुणे साई मंदिर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे, डाॅ. राजेश पटेल, डाॅ. विकास गुप्ता, डाॅ. डोनाल्ड बाबू, माजी जिल्हा परिषद सदस्य पार्वतीताई पाटील, मेडिकल असोसिएशनच्या सीमा पाटील, ॲड. प्रतिभा पाटील, 'फिनिक्स'च्या संस्थापक रेखा चिरनेरकर, रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे सर्व माजी रोटरियन्स हिरीरीने सहभागी झाले होते.
ए. आर. फिटनेसच्या अनिता राॅय यांनी झुंबा सादर करून रसिकांचा आपल्या तालावर थिरकवले. नितेश पंडित यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट...
महाराष्ट्र कॅन्सरमुक्त व्हावा, कॅन्सरविषयीची भीती कमी व्हावी आणि कॅन्सरविषयीच्या जनजागृतीसाठी मी प्रयत्नशील आहे.
-दिपाली गोडघाटे, संस्थापक- दिपीशा फौंडेशन.
कॅन्सरमुक्तीसाठी दिपीशा कॅन्सर आणि रिसर्च सेंटरचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांनी जनजागृतीसाठी वाॅकेथाॅन आयोजित करून खूप मोठे काम केले आहे.
-रविशेठ पाटील, संस्थापक- साई मंदिर देवस्थान, वहाळ.